Whatsapp: न विचारता व्हॉट्सऍप ग्रूपमध्ये ऍड केल्याचा राग! नाशकात तरुणावर जीवघेणा हल्ला, तुम्ही विचारुनच करताय ना?

| Updated on: Jun 05, 2022 | 6:01 PM

Nashik News Whatsapp crime स्थानिक पोलिसांनी दोघा अल्पवयीन तरुणांना या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी ताब्यात घेतलंय.

Whatsapp: न विचारता व्हॉट्सऍप ग्रूपमध्ये ऍड केल्याचा राग! नाशकात तरुणावर जीवघेणा हल्ला, तुम्ही विचारुनच करताय ना?
WhatsApp
Image Credit source: social
Follow us on

नाशिक : तुम्ही जर व्हॉट्सअप ग्रूपमध्ये (Whatsapp Group) कुणालाही न विचारता ऍड करत असाल, तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी! आजच्या घडीला व्हॉट्सऍप ग्रूप एक सामान्य गोष्ट आहे. एकाही व्हॉट्सऍप ग्रूपमध्ये नाही, असा एक माणूस सापडणं आता दुर्मिळ गोष्ट आहे. व्हॉट्सऍप (Whatsapp News) ग्रूपमध्ये असलेल्या तमाम मंडळीनी आणि व्हॉट्सऍप ग्रूपच्या ऍडमिनला धास्तावणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना घडली आहे नाशिकमध्ये. नाशकात (Nashik Crime News) एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या जीवघेण्या हल्ल्याचा कारण ठरलं, व्हॉट्सऍप ग्रूप. व्हॉट्सऍप ग्रूपमध्ये न विचारता ऍड केल्याचा राग मनात ठेवून एका तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. जखमी तरुणावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे व्हॉट्सऍप ग्रूपवर होणारे शुल्लक वाद टोकाला जात असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालंय.

नेमकं काय घडलं?

नाशिकच्या विजय नगर परिसरात ही धक्कादायक घटना घडली. न विचारचाच एका तरुणाला व्हॉट्सऍप ग्रूपमध्ये ऍड करण्यात आलं. या तरुणाच्या परवानगी शिवाय त्याला एका तरुणानं व्हॉट्सऍप ग्रूपमध्ये ऍड केलं होतं. याचा राग मनात ठेवून दोघांनी कोयत्यानं प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यामध्ये दीपक डावरे नावाचा तरुण जखमी झालाय. डावरे याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दोघा अल्पवयीन तरुणांना अटक

या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. स्थानिक पोलिसांनी दोघा अल्पवयीन तरुणांना या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी ताब्यात घेतलंय. सध्या ताब्यात घेण्यात आलेल्या अल्पवयीन तरुणांची पोलिसांकडून कसून चौकशी केली जाते आहे. मात्र या घटनेने सोशल मीडियातील शुल्लक वादातून टोकाची पावलं तरुणाई उचलत असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालंय.

हे सुद्धा वाचा

व्हॉट्सऍपवर स्टेटस, व्हॉट्सऍप ग्रूप, इन्स्टाग्राम पोस्ट, फेसबुक पोस्ट, यावरुन होणारे वाद वाढून टोकाच्या घटना घडत असल्याच्या बाबी सातत्यानं समोर येत आहेत. त्यामुळे चिंता देखील व्यक्त केली जाते आहे. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियाचा वापर संयतपणे करण्याची गरज निर्माण झाली आहे.