CCTV त दिसलं, दुचाकीवरून ते गेले, गोणीत काय होतं? तपासचक्र फिरली, तब्बल 35 लाखांचा ऐवज?

कांद्याची पंढरी म्हणून ओळख असलेल्या लासलगावमध्ये 35 लाखांच्या वर अधिकचा मुद्देमाल मध्यरात्री चोरट्यांनी लंपास केला आहे. यामध्ये महागडे मोबाइल चोरीला गेल्यानं जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

CCTV त दिसलं, दुचाकीवरून ते गेले, गोणीत काय होतं? तपासचक्र फिरली, तब्बल 35 लाखांचा ऐवज?
Image Credit source: TV9 Network
| Edited By: | Updated on: Apr 03, 2023 | 3:47 PM

नाशिक : नाशिक शहरासह ग्रामीण भागातही गुन्हेगारीने चांगलेच डोकं वर काढलं आहे. घरफोडी, हाणामाऱ्या, खून, दरोडे आणि अपहरण अशा विविध घटना घडत असतांना लासलगाव शहरात मध्यरात्री जवळपास 35 लाखांची चोरी झाली आहे. यामध्ये लासलगाव बसस्थानकासमोरील फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स दुकान फोडून महागडे मोबाईल चोरी केले आहे. यामध्ये विशेष बाब म्हणजे चोरांनी चोरी करण्यापूर्वी सीसीटीव्हीचा डिव्हीआर देखील काढून नेला आहे. विशेष म्हणजे दुचाकीवर येत चोरट्यांनी गोणीत भरून हा मुद्देमाल लंपास केला असून या चोरीच्या घटनेने शहरात खळबळ उडाली असून परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाली आहे. या शिवाय रात्रीच्या वेळी पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी केली जात आहे.

नाशिक जिल्ह्यातील कांद्याची सर्वात मोठी बाजार पेठ असलेल्या लासलगाव शहरात मोठी चोरीची घटना घडली आहे. लासलगाव बसस्थानकासमोर मयूर वाघचौरे यांच्या श्री समर्थ कृपा फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्सचे दुकानात चोरी झाली आहे.

सकाळी दुकान उघडले तेव्हा दुकानातील महागाडे मोबाइल फोन चोरीला गेल्याचे समोर आले. दुकानामध्ये फर्निचरसाठी मागील बाजूला एक छोटे शटर बसवले तेच शटर चोरट्यांनी वाकवून चोरी केली आहे.

मध्यरात्री 1 वाजेच्या दरम्यान चोरीची ही घटना घडली आहे. ही चोरी करत असतांना चोरट्यांना सीसीटीव्ही निदर्शनास आल्याने चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेराचा डिव्हीआर सुद्धा चोरून नेला आहे. चोरीचा कुठलाही पुरावा ठेवायचा नाही यासाठी चोरांनी शक्कल लढवली होती.

मात्र, चोरांनी तेथील डिव्हीआर जरी चोरून नेला असेल तरी रस्त्याने जातांना पेट्रोल पंपाच्या सीसीटीव्ही मध्ये चोरटे चित्रित झाले आहे. दुचाकीवरुन गोणीत मोबाइल मुद्देमाल घेऊन जात असतांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून आले आहे.

लासलगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांनी तपास सुरू केला आहे. दरम्यान रेकी करूनच ही चोरी झाल्याचा संशय पोलिसांना असून अधिकचा तपास केला जात आहे.