कुर्ल्यातील ड्रग्ज व्यापाऱ्याला लग्नमंडपातच अटक; एनसीबी अधिकाऱ्यांनी त्याला ‘सिंगल’च ठेवलं

| Updated on: Feb 11, 2021 | 12:00 AM

एनसीबीने एका मोठ्या ड्रग्स व्यापाऱ्याला अटक केली आहे. (NCB arrest One More drug trader in Mumbai) 

कुर्ल्यातील ड्रग्ज व्यापाऱ्याला लग्नमंडपातच अटक; एनसीबी अधिकाऱ्यांनी त्याला सिंगलच ठेवलं
Follow us on

मुंबई : एनसीबीने एका मोठ्या ड्रग्स व्यापाऱ्याला अटक केली आहे. काही दिवसापूर्वी एनसीबीने बबलू पटरी या ड्रग्स व्यापाऱ्याला अटक केली होती. त्याच्या चौकशीत एका आरोपीचे नाव उघड झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. मुख्य म्हणजे ताब्यात घेतलेल्या ड्रग्स पेडलरचं आज लग्न होत. ऐन लग्न मंडपातून त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. (NCB arrest One More drug trader in Mumbai)

नवरदेव म्हटलं की तो मांडवात असायला हवा, असे आपण गृहीतच धरतो. मात्र, हा नवरदेव नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या गाडीत आहे. नवरदेव म्हटलं की, त्याची वरात असते. मात्र या नवरदेवाची वरात एनसीबी अधिकाऱ्यांनी काढली आहे. याला चक्क लग्नाच्या मांडवातून उचलून आणलं आहे. हा मोठा ड्रग्स सप्लायर आहे.

एनसीबीच्या मुंबई युनिटच्या अधिकाऱ्यांनी 8 फेब्रुवारी कुर्ला येथे मोठी कारवाई केली होती. यावेळी अधिकाऱ्यांनी झाकीर हुसेन शेख उर्फ बबलू पटरी याला अटक केली होती. या कारवाईत 20 किलो कोडीएन कफ सिरफ , 56 ग्रॅम एमडी, 450 ग्रॅम गांजा इत्यादी ड्रग्ज जप्त करण्यात आलं होतं.

झाकिर हुसेन अब्दुल रहमान उर्फ बबलू पटरी आणि त्याचा साथीदार शहाब मुल्ला याच्याकडून हे ड्रग्स जप्त केलं होतं. बबलू पटरी हा पॉली ड्रग्स मोठ्या प्रमाणात सप्लाय करत होता. बांद्रा, कुर्ला आणि दक्षिण मुंबई परिसरात हा व्यक्ती ड्रग्ज सप्लाय करायचा. त्याच्याकडून एक कारही जप्त करण्यात आली आहे.

या कारचा वापर ड्रग्स सप्लाय करण्यासाठी केला जात होता. बबलू हा मोठा जमीनदार आहे. त्याची कुर्ला परिसरात प्रचंड दहशत आहे. या अशा मोठ्या ड्रग्स पेडलरची गॅंग चालवणाऱ्या बबलू याला हा ड्रग्स सप्लाय करायचा. बबलू यांच्याकडे सापडलेलं कोडीएन ड्रग्स हे याच व्यक्तीने पुरवलं होतं. अर्थात हा मोठा ड्रग्स सप्लाय करणारा आहे. (NCB arrest One More drug trader in Mumbai)

संबंधित बातम्या : 

बॉलीवूड ड्रग्ज रॅकेट प्रकरणातील ‘या’ आरोपीला परदेशी जाण्याची परवानगी

‘अल्लाचा प्रकोप होईल’ अशी भीती दाखवत 15 लाखांची फसवणूक, वसईत 2 भामटे गजाआड