1 लाखात मुलगी, 2 लाखात मुलगा…, गरीब कुटुंबाकडून मुलं विकत घेऊन पुढे त्यांच्यासोबत काय व्हायचं? मोठं रॅकेट समोर

1 लाखात मुलगी, 2 लाखात मुलगा... तुम्हाला देखील ऐकून विचित्र वाटलं असेल... पण असं एक मोठं रॅकेट समोर आलं आहे, ज्यामध्ये गरीब कुटुंबाकडून टोळी मुलं मुलं विकत घ्यायची आणि...., हे प्रकरण समोर आल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली...

1 लाखात मुलगी, 2 लाखात मुलगा..., गरीब कुटुंबाकडून मुलं विकत घेऊन पुढे त्यांच्यासोबत काय व्हायचं? मोठं रॅकेट समोर
| Updated on: Jun 19, 2026 | 3:26 PM

दिल्ली पोलिसांनी नवजात मुलांची खरेदी – विक्री करणाऱ्या टोळीचा फर्दाफाश केला आहे. या टोळीचं नेटवर्क दिल्ली पासून राजस्तान आणि दुसऱ्या राज्यांपर्यंत पोहोचलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकारणातील 12 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तर 5 नवजात मुलांची सुखरुप सुटका केली आहे. तापासात असं समोर आलं आहे की, टोळीतील सदस्य गरीब कुटुंबाकडून त्यांच्या मुलांची खरेदी करायचे आणि अशा लोकांना विकायचे, ज्या जोडप्यांना मुल होत नाही. ही टोळी गरीब कुटुंबांकडून मुली 1 लाख तर, मुलं 2 लाख रुपयांमध्ये विकायचे…

सामन्य व्यक्तीने समोर आणलं सत्य

पोलीस उपायुक्त (DCP) रोहित राजवीर सिंग यांनी सांगितल्यानुसार, एका सामान्य नागरिकाकडून मिळालेल्या माहितीनंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं. एका व्यक्तीने पोलिसांना कळवलं की, एक महिला लहान मुलांसह वारंवार पहाडगंज भागात यायची आणि थोड्याच वेळात तिथून निघून जायची. तिचं वागणं अत्यंत संशयास्पद होतं; ती वारंवार ये-जा करत करायची आणि तिला कायम वेगवेगळ्या मुलांसोबत पाहिले गेलं होतं.

20 हजार रुपयांच्या टोकन अमाउंटवर झालेला सौदा

माहिती मिळाल्यानंतर पोलिसांना तात्काळ तपास सुरु केला. परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीटी कॅमेऱ्यांचे सर्व व्हिडीओ तपासण्यात आले. फुटेजच्या आधारावर पोलिसांनी संशयीत महिलेची ओळख पटवली आणि तिच्या प्रत्येक हलचालींवर करडी नजर ठेवली. प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलिसांनी एक टीम तयार केली आहे खोटे ग्राहक म्हणून महिलेशी संपर्क साधला… पोलिसांनी बाळ घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर महिलेने 20 हजार रुपयांमध्ये सौदा पक्का केला.

5 दिवसांचं नवजात बाळ सापडलं

जेव्हा महिला नवजात बाळ घेऊन पोहोचली आणि पोलिसांना बाळ दिलं, घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतलं. महिलेचं नाव ज्योती असं आहे. तिच्यासोबत शालू नावाची महिला देखील होती आणि एक पुरुष देखल होता. पोलिसांनी सर्वांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या बाळाचा सौदा करण्यात आलेला ते बाळ फक्त 5 दिवसांचं होतं. एवढ्या लहान मुलाला विकण्याची तयारी सुरु होती. अखेर पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरु केला आहे.

तपासात ज्योती आणि तिच्यासोबत असणाऱ्यांनी सर्व माहिती पोलिसांना दिली आहे. याप्रकरणी पोलिसांसमोर धक्कादायक माहिती समोर येत आहे. यामध्ये प्रत्येकाची वेगळी भूमिका होती. दिव्या आणि प्रतिभा नावाच्या महिला मुलांचा सप्लाय करायच्या.

1 लाख रुपयांत मुलगी, तर 2 लाख रुपयांमध्ये मुलगा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलींना जवळपास 1 लाख रुपयांमध्ये खरेदी केलं जायचं आणि 3 – 4 लाख रुपयांमध्ये विकलं जायचं. तर नवजात मुलांची खरेदी 2 लाख रुपयांमध्ये केली जायची आणि 5 – 8 लाख रुपयांमध्ये विक्री केली जायची. काही प्रकरणी असं देखील समोर आलं आहे की, जुळे मुलं नसताना देखील जुळी मुलं असल्याचं सांगून त्यांची विक्री केली जायची.

याप्रकरणी मुख्य आरोपी कालिया याला गुजरात येथून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कालिया याचं काम गरीब कुटुंबियांच्या मुलांचा शोध घेणं आणि त्यांना नेटवर्कपर्यंत पोहोचवणं असं होतं… या कारवाई दरम्यान, नवजात मुलांची तस्करी करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. पोलिसांचं असं म्हणणं आहे की, तपास अद्याप सुरु आहे आणि येत्या काही दिवसां अन्य लोकांना देखील अटक होऊ शकते.

Follow Us