AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ladki Bahin Yojana : 1500 की 3000… लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर नेमके किती रुपये जमा? खात्यावर थेट…महत्त्वाची माहिती समोर!

लाभार्थी महिलांनी ई-केवायसी करावी असे आवाहन केल्यानंतर त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. यातून साधारण 80 लाख महिला अपात्र ठरल्या. म्हणजेच आता 80 लाख महिलांना या योजनेचा लाभ दिला जात नाहीये.

Ladki Bahin Yojana : 1500 की 3000... लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर नेमके किती रुपये जमा? खात्यावर थेट...महत्त्वाची माहिती समोर!
ladki bahin yojanaImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 19, 2026 | 3:11 PM
Share

Ladki Bahin Yojana : राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये महिना दिला जातो. ज्या महिला या योजनेच्या निकषात बसतात त्यांनाच हा लाभ दिला जात आहे. दरम्यान सध्या सरकारकडून मे महिन्याचे दीड हजार रुपये महिलांच्या बँक खात्यात ट्रान्सफर केले जात आहेत. तुमच्याही बँक खात्यात पैसे जमा झालेले आहेत का ते लगेच जाऊन चेक करावे असे आवाहन करण्यात आले आहे. राज्य सरकारने याआधी मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे एकाच वेळी जमा केले होते. काही महिलांच्या बँक खात्यात थेट 3000 रुपये जमा झाले होते. त्यामुळे यावेळीदेखील तीन हजार रुपये मिळणार की नेहमीप्रमाणे दीड हजार रुपये बँक खात्यात जमा होणार असा प्रश्न लाभार्थी महिलांकडून विचारला जात आहे.

1500 की 3000 रुपये मिळणार?

मिळालेल्या माहितीनुसार 15 जून रोजी पासून लाभार्थी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर दीड हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे त्यासाठी राज्य सरकारने 10 जून रोजी 344 कोटी रुपयांची तरतूद केली आहे ज्या महिलांनी यशस्वीरित्या एक केवायसी पूर्ण केलेली आहे तसेच ज्या महिला या योजनेच्या निकषात बसत आहेत त्यांनाच हे पैसे मिळत आहेत. याआधी सरकारने मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे एकत्रितपणे महिलांच्या बँक खात्यावर पाठवले होते. त्यामुळे यावेळीदेखील मे आणि जून महिन्याचे एकूण 3000 रुपये मिळतील, अशी आशा महिलांना होती. परंतु यावेळी सरकारकडून दीड हजार रुपयेच ट्रान्सफर केले जात आहेत. म्हणजेच यावेळी महिलांना जून महिन्याचे पैसे मिळालेले नाहीत. आता जून महिन्याचे पैसे हे जुलै महिन्यात दिले जाण्याची शक्यता आहे.

ई-केवायसी पुन्हा एकदा सुरू होणार?

लाभार्थी महिलांनी ई-केवायसी करावी असे आवाहन केल्यानंतर त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. यातून साधारण 80 लाख महिला अपात्र ठरल्या. म्हणजेच आता 80 लाख महिलांना या योजनेचा लाभ दिला जात नाहीये. सध्या ई-केवायसीची प्रक्रिया बंद करण्यात आली आहे. परंतु काही महिलांना तांत्रिक तसेच इतर कारणामुळे ही प्रक्रिया पार पडता आलेली नाही. त्याचेंही नाव लाभार्थी यादीतून हटवण्यात आले आहे. त्यामुळे आता राज्य सरकार पुन्हा एकदा ई-केवायसीची प्रक्रिया सुरू करण्याची शक्यता आहे. तसे सूतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेले आहे. आता नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम