AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुझ्यात खरंच दम आहे का? श्रीसंतचं हरभजन सिंगला ओपन चॅलेंज!

Sreesanth vs Harbhajan Singh: हरभजन सिंग आणि एस श्रीसंत यांच्यातील वाद सर्वश्रूत आहे. ठरावीक कालावधीनंतर या दोघांमधील वाद या ना त्या कारणाने चव्हाट्यावर येत असतो. असं असताना श्रीसंतने हरभजन सिंगला बॉक्सिंग रिंगमध्ये उतरण्याचं आव्हान दिलं आहे.

तुझ्यात खरंच दम आहे का? श्रीसंतचं हरभजन सिंगला ओपन चॅलेंज!
श्रीसंतचं हरभजन सिंगला ओपन चॅलेंज! बॉक्सिंग रिंगमध्ये उतरून दोन हात करण्याचं आव्हान Image Credit source: Getty Images
| Updated on: Jun 19, 2026 | 3:23 PM
Share

Sreesanth Open Challenge to Harbhajan Singh For Ring Fight: आयपीएल 2008 मध्ये हरभजने श्रीसंतच्या कानाखाली मारली होती. त्यानंतर बराच वाद रंगला होता. तेव्हापासून आतापर्यंत या वादाबाबत काही ना काही समोर आलं आहे. त्यात ललित मोदीने मागच्या वर्षी या प्रकरणाचा न पाहिलेला व्हिडीओ शेअर केला होता. त्यामुळे या वादाला आणखी फोडणी मिळाली होती. जवळपास 17 वर्षानंतर प्रत्यक्ष काय घडलं? हा व्हिडीओ लोकांना पाहायला मिळाला होता. त्यामुळे भारताचा माजी वेगवान गोलंदाज एस श्रीसंत आणि फिरकीपटू हरभजन सिंग पुन्हा एकदा चर्चेत आले होते. आता या वादात आणखी अध्याय जोडला जाणार आहे. श्रीसंतने एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी त्याने थेट हरभजन सिंगला बॉक्सिंग रिंगमध्ये उतरून सामना करण्याचं ओपन चॅलेंज दिलं आहे.

पुन्हा वादाला मिळाली होती फोडणी

क्रिकेट विश्वातील या सर्वात मोठ्या वादानंतर श्रीसंतने हरभजन सिंगला माफ केलं होतं. पण 2026 मध्ये एक जाहिरात समोर आली आणि पुन्हा या वादाला फोडणी मिळाली. ही जाहिरात मार्केटिंग एपच्या रिपब्लिक डे सेलासाठी केली होती. यात हरभजन सिंगला कानाखाली मारणाऱ्या शिक्षकाच्या रुपात दाखवलं गेलं. ही जाहिरात 2008 साली झालेल्या वादाशी जोडली गेल्याचं स्पष्टपणे दिसून आलं. त्यानंतर वाद रंगला. या दरम्यान, श्रीसंत द लल्लनटॉपच्या एका कार्यक्रमात पोहोचला आणि त्याने आपलं म्हणणं मांडलं. तसेच हरभजन सिंगला बॉक्सिंग रिंगमध्ये सामना करण्याचं आव्हान दिलं.

काय म्हणाला श्रीसंत?

या कार्यक्रमादरम्यान स्क्रिनवर श्रीसंत आणि हरभजन सिंग यांचा बॉक्सिंग गियर घातलेला एक जुना फोटो दाखवला गेला. तेव्हा श्रीसंतच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्याने फोट पाहिल्यानंतर कॅमेऱ्यासमोर हरभजन सिंगला आव्हान देत सांगितलं की, ‘तुझ्यात दम आहे का? माझ्यासमोर रिंगमध्ये लढण्याची हिम्मत आहे का? तू करार करून रिंगमध्य उतरू शकतो का? मी हरभजन सिंगला हा प्रश्न थेट विचारत आहे. ग्लव्स घालून रिंगमध्ये उतरण्याचं काळीज आहे का? हा काही अभिनय नाही. मी हसत आहे. तिथे तू हसत देखील नाहीस. चला पाहूयात, हे माझं ओपन चॅलेंज आहे.’

श्रीसंतने या प्रकरणी नवा खुलासा करताना सांगितलं की, ‘ही बाब मैदानात संपली असं नाही. मी पंजाब किंग्सच्या ड्रेसिंग रुममध्ये हरभजनला भिडण्यासाठी गेलो होते. तेव्हा पंजाबचे प्रशिक्षक टॉम मूडी आणि ब्रेट लीने त्याला लांब नेलं. मी भिडण्यासाठी तयार होतो.’

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी