
८० ते ९० च्या दशकात अंडरवर्ल्डचे बॉलिवूडशी चांगले संबंध निर्माण झाले होते. त्याकाळी डॉन दाऊद इब्राहिम हा बॉलीवूडवर अक्षरश: राज्य करायचा. चित्रपटसृष्टी आणि स्मगलिंग तसेच इधर धंदे तो परदेशात बसुन करायचा. दाऊद ज्याच्या डोक्यावर हात ठेवेल त्याचे एकतर भाग्य उजळेल किंवा तो कायमचा संपेल असे वातावरण होते. त्याकाळी काही अभिनेत्रींवर दाऊदचा जीव जडला होता. अनेक अशा अभिनेत्री होत्या ज्यांच्या सोबत दाऊदचे अफेअर होते. यात काही अभिनेत्रींनी हे स्विकारले तर काहींनी शांतच रहाणे पसंद केले.
बॉलीवूडची कोणतीही हिरोईन दाऊदला पसंद पडली तर तो तिला फोन करायचा. जर तिने मागणी पू्र्ण केली तर सर्व ठीक अन्यथा तिचे नशीबच फिरले समजा एवढी दहशत दाऊदची होती. असा त्याकाळातील चार अभिनेत्रींचे दाऊदशी संबंध असल्याचे बातम्यात आले होते. यातील काही अभिनेत्रींचे अफेअर चालले. काही गायब झाल्या तर काही लग्न करुन आपला संसार करीत आहेत. चला तर पाहूयात कोण आहेत या अभिनेत्री ?
येथे पोस्ट पाहा –
80 च्या दशकात मंदाकिनी राज कपूर यांच्या राम तेरी गंगा मैली ( 1986 ) मधून प्रचंड प्रसिध्दीला आली. या चित्रपटात दाऊदने तिला पाहीले आणि तो दिवाना झाला. काही वर्षांनी मंदाकिनीचा एक फोटो व्हायलर झाला तो साल 1994 मधला होता. त्यात ती दाऊद सोबत बसून क्रिकेट मॅच पाहात असताना दिसत होती. त्यानंतर खूप वाद झाला. मंदाकिनी सर्व वावाड्या असल्याचे सांगितले. अनेक वर्षांनंतर ती भारतात आली आणि तिने एका डॉक्टरशी लग्न केले असून इंस्टाग्रामवर एक्टीव्ह असते.
अभिनेत्री जॅस्मीन धुन्ना
1988 मध्ये प्रदर्शित ‘वीराना’ या भयपटात प्रमुख भूमिका करणारी अभिनेत्री जॅस्मीन धुन्ना प्रचंड सुंदर दिसली होती.हा चित्रपट हिट झाल्यानंतर अनेक निर्माते तिला शोधत होते पण ती अचानक गायब झाली. मीडियातील बातम्यानुसार दाऊद तिचा आशिक झाला होता. तिला फोनवरुन धमक्या देत होता. त्यानंतर ती अचानक गायब झाली. आज ती कुठे आहे हे कोणालाच माहीती नाही.
पाकिस्तानी अभिनेत्री अनिता अयूब हीने हिंदी चित्रपटातही काम केले.जेव्हाती हिंदी चित्रपटसृष्टीत स्ट्रगल करीत होती. दाऊदने तिला आधार दिला. त्यांच्यात अफेअर असल्याच्या वावड्या खुप उडल्या. त्यानंतर काही घडामोडी अशा घडल्या की ही अभिनेत्री देखील अचानक नाहीशी झाली. बातम्यानुसार अनिता अयुब आता न्यूयॉर्कमध्ये तिच्या मुलासोबत रहाते.
पाकिस्तानी अभिनेत्री महविश हयात हीचेही दाऊद सोबत अफेअरचे किस्से आहेत. महविश एक आयटम गर्ल होती.एका गाण्यात तिला पाहून दाऊदचे मन तिच्यावर जडले. ३७ वर्षांच्या महविश हीने आजपर्यंत लग्न केलेले नाही. ट्रीब्युनला दिलेल्या एका मुलाखतीत महविश हीने म्हटले होते की आपण लग्नाबाबत गंभीरपणे विचार करीत आहोत आणि लवकरच गोड बातमी देऊ.