Video | लसीकरणाचा पुरावा मागितल्याचा राग, हॉटेलच्या महिला कर्मचाऱ्याला तिघी जणींची मारहाण

| Updated on: Sep 20, 2021 | 1:11 PM

न्यूयॉर्क शहरा (NYC) च्या अप्पर वेस्ट साइडमध्ये असलेल्या कार्मिन रेस्टॉरंटमध्ये हा प्रकार घडला. 17 ऑगस्टपासून, न्यूयॉर्क शहरात 12 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना इनडोअर डायनिंग एरियामध्ये प्रवेश करण्यापूर्वी कोव्हिड -19 लसीचा किमान एक डोस मिळाला आहे, याचा पुरावा दाखवणे आवश्यक आहे.

Video | लसीकरणाचा पुरावा मागितल्याचा राग, हॉटेलच्या महिला कर्मचाऱ्याला तिघी जणींची मारहाण
हॉटेलबाहेर मारहाणीची घटना
Follow us on

न्यूयॉर्क : न्यूयॉर्क शहरातील एका रेस्टॉरंट होस्टेसने टेक्सासमधील तीन महिलांना लसीकरणाचा पुरावा मागितल्यावर तिच्यावर हल्ला करण्यात आला होता. गुरुवारी संध्याकाळी घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांनी तिघी हल्लेखोर महिला ग्राहकांना ताब्यात घेतले आहे.

लसीकरणाचा पुरावा आवश्यक

न्यूयॉर्क शहरा (NYC) च्या अप्पर वेस्ट साइडमध्ये असलेल्या कार्मिन रेस्टॉरंटमध्ये हा प्रकार घडला. 17 ऑगस्टपासून, न्यूयॉर्क शहरात 12 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना इनडोअर डायनिंग एरियामध्ये प्रवेश करण्यापूर्वी कोव्हिड -19 लसीचा किमान एक डोस मिळाला आहे, याचा पुरावा दाखवणे आवश्यक आहे. रेस्टॉरंट्समधील कर्मचाऱ्यांना देखील लसीकरण करण्यात यावे, असे आदेश प्रशासनाने दिले आहेत.

नेमकं काय घडलं?

अर्थात, 12 वर्ष आणि त्याहून अधिक किंवा 18 वर्ष आणि त्याहून अधिक वयाचा अर्थ असा नाही की प्रत्येक जण नियमांबाबतही प्रौढ म्हणून वागेल. टेक्सासमध्ये चिकन आणि ब्रोकोलीवर ताव मारायला आलेल्या तीन ग्राहकांनी लसीकरणाचा पुरावा देण्यास सांगितल्याचे फारसे गांभीर्याने घेतले नाही. कदाचित त्यांना वाटले की त्यांच्या “स्वातंत्र्यांचे” उल्लंघन होत आहे. म्हणूनच त्यांनी महिला कर्मचाऱ्याशी हुज्जत घालायला सुरुवात केली.

वाद इतका वाढला की तिघी ग्राहकांपैकी एकीने महिला मॅनेजरला धक्काबुक्की आणि थप्पड मारण्यास सुरुवात केली. त्यानंतर इतर दोघीही भिडल्या. शेवटी रेस्टॉरंटमधील अन्य कर्मचाऱ्यांनी महिला मॅनेजरच्या बचावासाठी मध्यस्थी केली. अखेरीस, पोलिसांना पाचारण करावे लागले आणि त्यांनी मारहाण करणाऱ्या महिलांना ताब्यात घेतले.

पाहा व्हिडीओ :

दुसरीकडे, सोशल मडियावर सध्या बीडचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओत एक महिला आणि पुरुषामध्ये मारहाण होताना दिसत आहे. व्हिडीओतील महिला पुरुषाला मारहाण करतेय. तर पुरुषही तिचा प्रतिकार करत त्या महिलेवर हात उचलताना दिसतोय. महिला जेव्हा पुरुषाला पायाने मारहाण करते तेव्हा तो देखील महिलेला पायाने मारण्याचा प्रयत्न करतो. यावेळी महिला त्या पुरुषाला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करतेय. महिलेसोबत आणखी एक व्यक्ती आहे ती व्यक्ती त्या पुरुषाला दोषी ठरवत आहे. तर घटनास्थळी असलेले काही लोक हा वाद सोडवण्याचा प्रयत्न करतात. यावेळी कुणीतरी मोबाईलच्या कॅमेऱ्यात हा सगळा प्रकार कैद करतं. हाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्यामुळे बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

संबंधित बातम्या :

VIDEO : महिला आणि पुरुषात जुंपली, अर्वाच्य भाषेत शिवीगाळ-मारहाण, बीडमधील धक्कादायक घटना

नाश्ता बनवायचा म्हणून आईने बापाकडे बाळ दिलं, बापाकडून चिमुरड्याचा गळा चिरुन निर्घृण खून

मावस भावासोबत अनैतिक संबंध, तीन मुलांची आई असूनही पतीची निर्घृण हत्या, प्रियकरासाठी काहीही