मावस भावासोबत अनैतिक संबंध, तीन मुलांची आई असूनही पतीची निर्घृण हत्या, प्रियकरासाठी काहीही

प्रेम ही संकल्पना खूप सुंदर आहे. आपण जितकं त्या संकल्पनेला समजण्याचा प्रयत्न करतो तितकी ती संकल्पना आणखी समृद्धपणे उपजत जाते. पण काही लोक या संकल्पना किंवा भावनेचा विचित्र अर्थ काढतात आणि ते विकृत मार्गाला लागतात.

मावस भावासोबत अनैतिक संबंध, तीन मुलांची आई असूनही पतीची निर्घृण हत्या, प्रियकरासाठी काहीही
प्रातिनिधिक फोटो

पाटणा : प्रेम ही संकल्पना खूप सुंदर आहे. आपण जितकं त्या संकल्पनेला समजण्याचा प्रयत्न करतो तितकी ती संकल्पना आणखी समृद्धपणे उपजत जाते. पण काही लोक या संकल्पना किंवा भावनेचा विचित्र अर्थ काढतात आणि ते विकृत मार्गाला लागतात. नैतिकतेच्या सर्वच भिंती तोडून ते अनपेक्षित आणि संतापजनक कृत्य करतात. या कृत्यांवर आपण नि:शब्द होतो. तशीच काहिशी घटना बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातून समोर आली आहे. एका महिलेने आपल्या प्रियकर आणि त्याच्या मित्रांच्या मदतीने हत्या केली. विशेष म्हणजे पोलिसांना मृतकाच्या हत्येचा उलगडा करताना प्रचंड मेहनत घ्यावी लागली. त्यानंतर सर्व प्रकार उघडकीस आला.

नेमकं प्रकरण काय?

गेल्या आठवड्यात बुधवारी मधुबनी जिल्ह्यात एका रस्त्याच्या कडेला एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळला. काही गावकऱ्यांच्या निदर्शनास तो मृतदेह आला. त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिकांनी तातडीने याबाबतची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर मृतकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला.

मृतकाची ओळख पटली

पोलिसांनी सुरुवातील तपास केला तेव्हा मृतकाची ओळख समजू शकत नव्हती. पण अखेर पोलिसांना घटनास्थळी काही धागेदोरे मिळाले. त्याआधारे मृतक हा भगवतीपूर गावचा रहिवासी असल्याचं उघड झालं. मृतकाची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी तपासाची आर्धी लढाई जिंकली. मृतकाचं नाव मोहम्मद माशूक असं असल्याचं उघड झालं. त्यानंतर पोलिसांनी मृतकाच्या गावात जावून चौकशी करण्यास सुरुवात केली. यावेळी पोलिसांना सूत्रांच्या आधारे काही महत्त्वपूर्ण माहिती मिळाली.

पत्नीचा जबाब ऐकून पोलीसही चक्रावले

पोलिसांनी सुरुवातीला मोहम्मद माशूखच्या पत्नी नसीमा खातून हिची चौकशी केली. त्यावेळी तिच्या जाबाबावर पोलिसांना संशय आला. पोलिसांनी तिची कसून चौकशी केली असता तिने आपला गुन्हा कबूल केला. तिचा दिलेला जबाब ऐकून पोलीसही चक्रावले. कारण तिने आपल्या अनैतिक प्रेमसंबंधांसाठी हे सगळं कृत्य केलं.

…म्हणून पत्नीने पतीचा काटा काढला

मृतकाची पत्नी नसीमा ही गेल्या तीन वर्षांपासून तिचा मावस भाऊ मोहम्मद सोनू याच्यासोबत प्रेमसंबंधात होती. विशेष म्हणजे नसीमा हिला मृतक माशूमपासून तीन मुलं आहेत. तरीही तिचे प्रेमसंबंध सुरु होते. दोघांच्या प्रेमात पती माशूमचा अडथळा होता. या अडथळाला दूर सारण्यासाठी त्यांनी माशूमचा काटा काढण्याचं ठरवलं. यासाठी त्यांनी मासूमच्या हत्येचा कट रचला. विशेष म्हणजे या कृत्यात नसीमा हिची आई म्हणजेच मृतकाची सासू देखील होती.

आरोपींनी मृतकाला आधी दारु पाजली, नंतर हत्या

नसीमाचा प्रियकर मोहम्मद सोनू याने गेल्या आठवड्यात बुधवारी रात्री मोहम्मद माशूम याला खूप दारु पाजली. यावेळी सोनूचे आणखी तीन मित्रही होते. दारु पाजल्यानंतर आरोपी माशूमला बाईकने एका पुलाजवळ घेऊन गेले. तिथे त्यांनी माशूमवर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. यात माशूम रक्तबंबाळ झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन पळून गेले. दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांना माशूमचा मृतदेह दिसला. त्यानंतर पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली. पोलिसांनी अखेर या सर्व प्रकरणाचा उलगडा केला. पोलिसांनी याप्रकरणी सहा जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

हेही वाचा :

झाडाला लटकलेल्या ‘त्या’ मृतदेहाचे रहस्य उलगडले, पत्नीचे तरुणासोबतचे एडिट केलेले फोटो पाहून आले होते नैराश्य

बंगळुरुमध्ये ‘बुराडी’ची पुनरावृत्ती, पंख्याला 5 लटकलेले मृतदेह, 9 महिन्यांच्या मुलीचाही करुण अंत, देशाला हादरवणारी घटना

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI