VIDEO : महिला आणि पुरुषात जुंपली, अर्वाच्य भाषेत शिवीगाळ-मारहाण, बीडमधील धक्कादायक घटना

सोशल मडियावर सध्या बीडचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओत एक महिला आणि पुरुषामध्ये मारहाण होताना दिसत आहे. व्हिडीओतील महिला पुरुषाला मारहाण करतेय. तर पुरुषही तिचा प्रतिकार करत त्या महिलेवर हात उचलताना दिसतोय.

VIDEO : महिला आणि पुरुषात जुंपली, अर्वाच्य भाषेत शिवीगाळ-मारहाण, बीडमधील धक्कादायक घटना
महिला आणि पुरुषात जुंपली, अर्वाच्य भाषेत शिवीगाळ-मारहाण, बीडमधील धक्कादायक घटना

बीड : सोशल मडियावर सध्या बीडचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओत एक महिला आणि पुरुषामध्ये मारहाण होताना दिसत आहे. व्हिडीओतील महिला पुरुषाला मारहाण करतेय. तर पुरुषही तिचा प्रतिकार करत त्या महिलेवर हात उचलताना दिसतोय. महिला जेव्हा पुरुषाला पायाने मारहाण करते तेव्हा तो देखील महिलेला पायाने मारण्याचा प्रयत्न करतो. यावेळी महिला त्या पुरुषाला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करतेय. महिलेसोबत आणखी एक व्यक्ती आहे ती व्यक्ती त्या पुरुषाला दोषी ठरवत आहे. तर घटनास्थळी असलेले काही लोक हा वाद सोडवण्याचा प्रयत्न करतात. यावेळी कुणीतरी मोबाईलच्या कॅमेऱ्यात हा सगळा प्रकार कैद करतं. हाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्यामुळे बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

नेमतं प्रकरण काय?

संबंधित घटना ही बीड जिल्ह्यातील मित्र नगर भागातली असल्याची माहिती आता समोर आली आहे. तसेच ही घटना सात दिवसांआधीची म्हणजेच 11 सप्टेंबरची आहे. विशेष म्हणजे हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंतही पोहोचलं आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. कॅमेऱ्यासमोर काही गोष्टी दिसत आहेत. पण तो व्हिडीओ अवघ्या काही सेकंदाचा आहे. त्या व्हिडीओच्या मागे-पुढे अनेक गोष्टी घडल्या असतील. त्या घटना जाणून घेतल्यानंतरच पोलीस योग्य निष्कर्षावर येतील. त्यामुळे पोलीस आधी याप्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. त्यांचा तपास सुरु आहे.

महिला-पुरुषात मारहाण नेमकी का?

या प्रकरणी व्हायरल झालेल्या व्हिडीओत महिला आणि पुरुष यांच्यातील तुंबळ हाणामारी स्पष्ट दिसतेय. पण त्यामागे नेमकं कारण काय ते स्पष्ट होताना दिसत नाही. पण त्या दोघांमध्ये पैशांच्या कारणावरुन हा वाद उफाळलाची माहिती समोर आली आहे. पैशांवरुन दोघांमध्ये वाद झाला होता. याच वादाचं रुपांतर आधी बाचाबाची, शिवीगाळ नंतर हाणामारीत झालं. हाणामारीच्या वेळी घटनास्थळी काही लोकांनी त्यांना समजवण्याचा देखील प्रयत्न केला. मात्र महिला ऐकून घेण्याच्या तयारीत नव्हती, असं दिसतंय.

पोलिसात तक्रार दाखल, तपास सुरु

विशेष म्हणजे या प्रकरणी महिला ही शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गेली. तिथे तिने संबंधित व्यक्ती विरोधात तक्रार करत मारहाणीचा व्हिडीओ देखील दाखवला. महिलेने दिलेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी एनसी दाखल करुन घेतली आहे. घटनेतील सत्यता काय आहे? याचा तपास पोलीस करत आहेत, अशी माहिती शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक साईनाथ ठोंबरे यांनी माध्यमांना दिली. तसेच व्हिडीओत मारहाण करणारे महिला आणि पुरुष हे एकाच गावातील असल्याची माहिती समोर आलीय.

संबंधित घटनेचा व्हिडीओ बघा :

हेही वाचा :

अमेरिकेतील पतीकडून पत्नीवर हुंड्यासाठी अमानवीय अत्याचार; मित्रांना पाठवले अश्लील मेसेज, नाशिकमध्ये गुन्हा दाखल

नाश्ता बनवायचा म्हणून आईने बापाकडे बाळ दिलं, बापाकडून चिमुरड्याचा गळा चिरुन निर्घृण खून

मावस भावासोबत अनैतिक संबंध, तीन मुलांची आई असूनही पतीची निर्घृण हत्या, प्रियकरासाठी काहीही

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI