अमेरिकेतील पतीकडून पत्नीवर हुंड्यासाठी अमानवीय अत्याचार; मित्रांना पाठवले अश्लील मेसेज, नाशिकमध्ये गुन्हा दाखल

लग्नानंतर हुंड्याची (dowry) मागणी करत अमेरिकेत (America) राहणाऱ्या पतीने आपल्या पत्नीवर अमानवीय अत्याचार केला. तसेच पीडितेच्या मित्रांना अश्लील मेसेज (Pornographic messages) पाठवल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरून पतीसह सासरच्या मंडळीविरुद्ध नाशिकमधल्या इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमेरिकेतील पतीकडून पत्नीवर हुंड्यासाठी अमानवीय अत्याचार; मित्रांना पाठवले अश्लील मेसेज, नाशिकमध्ये गुन्हा दाखल
संग्रहित छायाचित्र.

नाशिकः लग्नानंतर हुंड्याची (dowry) मागणी करत अमेरिकेत (America) राहणाऱ्या पतीने आपल्या पत्नीवर अमानवीय अत्याचार केला. तसेच पीडितेच्या मित्रांना अश्लील मेसेज (Pornographic messages) पाठवल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरून पतीसह सासरच्या मंडळीविरुद्ध नाशिकमधल्या इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Husband abuses wife for dowry in America; Pornographic messages sent to friends)

विवाहितेचे सासर मूळचे मुंबईतल्या न्यू. माहिमचे आहे. ते 27 जानेवारी ते 7 सप्टेंबर 2020 पर्यंत गंगापूर रोड, नाशिकमध्ये राहायला होते. या काळात त्यांनी पीडितेचा छळ केला. लग्नामध्ये घरातून काहीच हुंडा आणला नाही. आता माहेरी जावून हुंडा आण, अशी मागणी केली. सासरच्या मंडळींनी शारीरीक तसेच मानसिक छळ केला, अशी तक्रार विवाहितेने दिली आहे. तिचा पती निखिल हरी शिंदे हा तिच्यावर अमानवीय अत्याचार करायचा. त्याने पीडितेच्या सोशल नेटवर्किंग साईटचे पासवर्ड घेतले. बँकेचे पासवर्ड घेतले. पीडितेच्या मित्रांना अश्लील मेसेज पाठवले. या साऱ्या जाचाला कंटाळून अखेर पीडितेने सासरच्या मंडळीविरुद्ध इंदिरानगर पोलिस ठाणे गाठून गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार तिचा पती निखिल हरी शिंदे (रा. एसटी ईव्हीईएन, अमेरिका) सासू मंदाकिनी हरी शिंदे, सासरे यशवंत शिंदे, दीर, आशिष हरी शिंदे, जाऊ नीता आशिष शिंदे, नणंद रूपाली राजेंद्र भदाणे, नंदोई राजेंद्र नथ्थू भदाणे, नणंद दीप्ती किरण आवारी, नंदोई किरण आवारी (सर्व रा. न्यू. माहिम, मुंबई) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसाकडून मुलीचे अपहरण

पोलिसानेच अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली होती. संशयित पोलीस दीपक जठार हा नाशिकमधील उपनगर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. संशयिताने पीडित मुलीच्या घरच्यांशी असलेल्या ओळखीचा फायदा घेत अपहरण केल्याचा आरोप आहे. फूस लावून त्याने तिला पळवून नेल्याचा दावा केला जात आहे. या घटनेमुळे नाशिकच्या पंचवटी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

रुग्णालयात विनयभंग

नाशिक शहरात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना सुरुच आहेत. हॉस्पिटलमध्ये आपल्या पतीवर उपचार करण्यासाठी आलेल्या महिलेचा विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांकडून या वाढत्या घटनांवर आळा घालण्यासाठी विशेष महिला पोलीस पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात विनयभंग आणि मुलींचं अपहरण होण्याच्या घटना वाढताना दिसत आहेत. हॉस्पिटलमध्ये आपल्या पतीवर उपचार करण्यासाठी आलेल्या महिलेचा एका इसमाने विनयभंग केल्याचा आरोप आहे. तर दुसरीकडे अंबड परिसरात एका अल्पवयीन मुलीचे घरातून अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. (Husband abuses wife for dowry in America; Pornographic messages sent to friends)

इतर बातम्याः

नाशिकः पोलिस कर्मचाऱ्याच्या अंत्ययात्रेत सहभागी होत पोलिस आयुक्तांनी दिला खांदा

केंद्रीय मंत्री आणि राज्याच्या मंत्र्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी; राजकीय धुळवडीची जोरदार चर्चा

पुढच्या वर्षी लवकर याः नाशिककरांना येथे करता येईल बाप्पांचे विसर्जन!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI