पुढच्या वर्षी लवकर याः नाशिककरांना येथे करता येईल बाप्पांचे विसर्जन!

नाशिककरांना (Nashik गणपती बाप्पांचे (Ganesh Fest) विसर्जन करण्यासाठी महापालिका प्रशासनाने (Municipal Corporation) 28 नैसर्गिक, तर 43 कृत्रिम स्थळांची सोय केली आहे. नदीतले प्रदूषण टाळण्यासाठी कृत्रिम तलावांची उभारणी केली आहे.

पुढच्या वर्षी लवकर याः नाशिककरांना येथे करता येईल बाप्पांचे विसर्जन!
गणपती बाप्पा मोरया
Follow us
| Updated on: Sep 18, 2021 | 11:26 AM

नाशिकः नाशिककरांना (Nashik गणपती बाप्पांचे (Ganesh Fest) विसर्जन करण्यासाठी महापालिका प्रशासनाने (Municipal Corporation) 28 नैसर्गिक, तर 43 कृत्रिम स्थळांची सोय केली आहे. नदीतले प्रदूषण टाळण्यासाठी कृत्रिम तलावांची उभारणी केली आहे. भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. (Nashik residents can immerse Ganpati Bappa here)

पंचवटी विसर्जन स्थळे

राजमाता मंगल कार्यालय, म्हसरूळ सीता सरोवर, नांदूर मानूर, आडगाव पाझर तलाव, तपोवन, रामकुंड परिसर, गौरी पटांगण, टाळकुटे सांडवा या नैसर्गिक स्थळावर विसर्जन करता येईल. कृत्रिम तलावामध्ये राजमाता मंगल कार्यालय, गोरक्ष नगर, आरटीओ कॉर्नर, नांदूर मानूर, कोणार्क नगर, तपोवन, प्रसाद महाराज गार्डन सरस्वती नगर, रामवाडी जॉगिंग ट्रॅक येथे विसर्जन करता येईल.

नाशिक पूर्व विसर्जन स्थळे

नाशिक पूर्वमधील कृत्रिम विसर्जन तलावात लक्ष्मी नारायण घाट, रामदास स्वामी मठाजवळ, टाकळी, रामदास स्वामी नगर, बस थांबा, नंदिनी-गोदावरी संगम, साईनाथ नगर चौफुली, डीजीपी नगर, गणपती मंदिराजवळ, शारदा शाळेसमोर, राणे नगर, कला नगर चौक, राजसारथी या तलावांचा समावेश आहे. नैसर्गिक स्थळी लक्ष्मी नारायण घाट, रामदास स्वामी मठ, आगर टाकळी, नंदिनी गोदावरी संगम येथेही विसर्जन करता येईल.

नाशिक पश्चिम विसर्जन स्थळे

नाशिक पश्चिमध्ये चोपडा लॉन्स, परीचा बाग, फॉरेस्ट पूल, बॅडमिंट हॉल, येवलेकर मळा, दोंदे पूल, उंटवाडी, महात्मानगर पालिका बाजार, लायन्स क्लब पंडित कॉलनी, शितळा देवी मंदिरासमोर या कृत्रिम तलावांमध्ये बाप्पांचे विसर्जन करता येईल. नैसर्गिक स्थळांमध्ये रोकडोबा पटांगण, कापुरथळा पटांगण, सिद्धेश्वर मंदिर घारपुरे घाट, हनुमान घाट येथे बाप्पांचे विसर्जन करता येईल.

सातपूरकर विसर्जन स्थळे

सातपूर भागातील नागरिकांना गंगापूर धबधबा, सोमेश्वर, चांदली पूल, मते नर्सरी या नैसर्गिक स्थळांवर बाप्पांचे विसर्जन करता येईल. कृत्रिम तलावामध्ये शिवाजीनगर, अशोक नगर पोलिस चौकी, नंदिनी नदी, अंबड-लिंकरोड, नंदिनी नदी आयटीआय पूल पाईपलाईन जॉगिंग ट्रॅक येथे विसर्जन करता येईल.

सिडको विसर्जन स्थळे सिडकोकरांना गोविंदनगर, जिजाऊ विद्यालय, राजे छत्रपती व्यायामशाळेजवळ, पवन नगर, सिडको, राजे संभाजी स्टेडियम, मीनाताई ठाकरे शाळा, कामटेवाडे, डे केअर शाळा, राजीव नगर या कृत्रिम तलावांवर बाप्पांचे विसर्जन करता येईल. तर पिंपळगाव खांब, वालदेवी घाट या नैसर्गिक स्थळांवरही बाप्पांचे विसर्जन करता येईल.

नाशिकरोड विसर्जन स्थळे

नाशिकरोड येथेही नैसर्गिक आणि कृत्रिम स्थळांची सोय करण्यात आली आहे. नैसर्गिक स्थळांमध्ये चेहेडी नदी किनारा, पंचक गोदावरी नदी, जनार्दन पुलालगत, दसक गाव, वालेदवी नदीतीरी, देवळाली गाव, विहितगाव येथे विसर्जन करता येईल. तर कृत्रिम स्थळांमध्ये मनपा शाळा क्रमांक 125, शिखरेवाडी मैदान, मनपा नर्सरी, जयभवानी रोड, मनपा क्रीडांगण, चेहेडी पंपिंग, नारायण बापू नगर, राजराजेश्वरी चौक, गाडेकर मळा, देवळाली गाव, के. एन. केला विद्यालय या ठिकाणी बाप्पांच्या विसर्जनाची सोय करण्यात आली आहे. (Nashik residents can immerse Ganpati Bappa here)

इतर  बातम्याः

मोठी बातमीः देशातील सर्वात रूंद बोगदे ऐतिहासिक वेळेत पूर्ण; कसारा घाट फक्त 5 मिनिटांत पार, मुंबई आणखी जवळ

नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर, अकोलामध्ये बांधकाम परवानगी आता ऑफलाइन

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.