नाशिकः पोलिस कर्मचाऱ्याच्या अंत्ययात्रेत सहभागी होत पोलिस आयुक्तांनी दिला खांदा

आडगाव परिसरातील पोलिस कर्मचारी प्रतीक जाधव यांचं निधन झालं. त्यावेळी पोलिस आयुक्त दीपक पांडेय एकदम भावुक झाले. त्यांनी जाधव यांच्या अंत्ययात्रेत सहभागी होत त्यांना खांदाही दिला.

नाशिकः पोलिस कर्मचाऱ्याच्या अंत्ययात्रेत सहभागी होत पोलिस आयुक्तांनी दिला खांदा
नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी पोलिस कर्मचारी प्रतीक जाधव यांच्या अत्यंयात्रेत सहभागी होत पार्थिवाला खांदा दिला.
Follow us
| Updated on: Sep 18, 2021 | 1:12 PM

नाशिकः आपल्यासोबत काम करणारा कर्मचारी निघून जाणं, हा मोठा धक्का असतो. हे नुकसान कशानंही भरून येत नाही. याची जाणीव होते, तेव्हा मन विदीर्ण होतं. काहीसं असंच नाशिकचे (Nashik) पोलिस आयुक्त (Commissioner of Police)  यांच्याबाबत झालं. आडगाव परिसरातील पोलिस कर्मचारी प्रतीक जाधव यांचं निधन झालं. त्यावेळी पोलिस आयुक्त दीपक पांडेय एकदम भावुक झाले. त्यांनी जाधव यांच्या अंत्ययात्रेत सहभागी होत त्यांना खांदाही दिला. (The Commissioner of Police gave a shoulder at the funeral of a police officer)

काळ मोठा निष्ठूर असतो. तो आपल्याला हवी असलेली माणसं सतत नेत असतो. या दुःख आणि वेदना कशानंही भरून निघणाऱ्या नसतात. नाशिक पोलिस विभागातही असंच घडलं. एकदम मनमिळावू म्हणून परिचित अससेले तरुण पोलिस कर्मचारी प्रतीक जाधव यांचं अचानक निधन झालं. ते अवघ्या 31 वर्षांचे होते. प्रतीक हे दंगल नियंत्रण पथकात कार्यरत होते. ते काही दिवसांपासून आजारी होते. त्यामुळं त्याच्यांवर लोकमान्य हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र, त्यांना वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं नाही. जिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पोलिस मुख्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ही बातमी समजली. त्यांनी तातडीनं पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांच्या कानावर ही खबर घातली. पांडेय यांनाही या बातमीनं धक्का बसला. इतक्या कमी वयात त्यांचं जाणं असं साऱ्यांनाच हुरहुर लावणारं होतं. त्यामुळं पोलिस आयुक्त पांडेय यांनी तातडीनं जाधव कुटुंबांचं घर घातलं. त्यांच्या घरातील मंडळींना दिलासा दिला. ते स्वतः प्रतीक यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले. मृत जाधव यांचे नातेवाईक सागर जाधव यांच्यासह स्वतः पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांनीही पार्थिवास खांदा दिला. जाधव यांच्या जाण्याचा पोलिस आयुक्तांना चांगलाच धक्का बसला. अधिकारी कितीही मोठा असला, तरी त्याच्या आतल्या एका कोपऱ्यात एक हळवा माणूस दडलेला असतो. त्याचचं दर्शन यावेळी झालं. प्रतीक यांच्या मृत्यूनं साऱ्यांनाच चटका लावला. पोलिस कर्मचाऱ्यांमध्येही हळहळ व्यक्त करण्यात येत होती. (The Commissioner of Police gave a shoulder at the funeral of a police officer)

इतर बातम्याः

केंद्रीय मंत्री आणि राज्याच्या मंत्र्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी; राजकीय धुळवडीची जोरदार चर्चा

पुढच्या वर्षी लवकर याः नाशिककरांना येथे करता येईल बाप्पांचे विसर्जन!

मोठी बातमीः देशातील सर्वात रूंद बोगदे ऐतिहासिक वेळेत पूर्ण; कसारा घाट फक्त 5 मिनिटांत पार, मुंबई आणखी जवळ

Non Stop LIVE Update
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.