AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फुकट काजू कतली पाहिजे होती, तरुणाने असं काही केलं की थेट पोलीसच कामाला लागले

पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील वडगाव बुद्रुक परिसरातील फुलपरी स्वीट मॉलमध्ये तरुण-तरुणी काजू कतली घेण्यासाठी आले होते.

फुकट काजू कतली पाहिजे होती, तरुणाने असं काही केलं की थेट पोलीसच कामाला लागले
Image Credit source: Google
Kiran Balasaheb Tajne
Kiran Balasaheb Tajne | Updated on: Dec 21, 2022 | 1:50 PM
Share

प्रदीप कापसे, पुणे : गुन्हेगारीच्या काही घटना अशा असतात की त्याची चर्चा ही मोठ्या प्रमाणात असते. क्षुल्लक कारणावरून काहीवेळा मोठा गुन्हा घडत असतो. असाच काहीसा प्रकार पुण्यातून समोर आला आहे. पुण्यातील सिंहगड रस्त्यावर ही घटना घडली आहे. सिंहगड रस्त्यावर असलेल्या फुलपरी स्वीट मॉलमध्ये तरुणाने गोळीबार केला आहे. गोळीबार करण्यामागील कारणही गमतीशीर आहे. एक किलो काजू कतली फुटक दिली नाही म्हणून गोळीबार केल्याची बाब समोर आली आहे. सोमवारी संध्याकाळी चार वाजेच्या दरम्यान ही घटना घडली असून सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. काजू कतलीसाठी गोळीबार केल्यानं पुण्यात खळबळ उडाली सिंहगड पोलीसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. वडगाव बुद्रुक परिसरात ही घटना घडल्याने या घटनेची जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील वडगाव बुद्रुक परिसरातील फुलपरी स्वीट मॉलमध्ये तरुण-तरुणी काजू कतली घेण्यासाठी आले होते.

एक किलो काजू कतली हवी म्हणून त्यांनी सांगितले, दुकानदाराने एक किलो काजू कतली पॅक केली, पैसे मागितले तेव्हा पैसे देण्यास नकार देत थेट बंदूक काढली आणि गोळीबार केला.

दुकानदाराने सुरुवातीला खेळणीतील बंदूक असावी म्हणून दुर्लक्ष केलं पण दुकानातील बंदुकीची गोळी पाहून गोळी खरी असल्याचे लक्षात आल्याने दुकानदाराने थेट पोलीस ठाणेच गाठलं.

दुकानदारांच्या संघटनेच्या पदाधिकऱ्यांनी याबाबत पोलिसांत धाव घेत कारवाईची मागणी केली होती, त्यात चौकशी करून सीसीटीव्हीचा आधार घेत गुन्हा दाखल केला आहे.

सीसीटीव्हीच्या आधारे तरुण आणि तरुणीला ताब्यात घेण्यात आले असून काजू कतलीसाठी गोळीबार केल्याची कबुली त्यांनी दिली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना