मध्यरात्री वृद्धमहिलेचे कापले पाय आणि… धक्कादायक आहे प्रकरण, जाणून पाणावतील डोळे

Crime : जोडप्याने वृद्ध महिलेला निर्जन स्थळी नेलं, पत्नीने वृद्ध महिलेचं तोंड दाबलं आणि पतीने पाय कापले... धक्कादायक प्रकरणामुळे परिसरात खळबळ, जाणून तुमचेही पाणावतील डोळे...

मध्यरात्री वृद्धमहिलेचे कापले पाय आणि... धक्कादायक आहे प्रकरण,  जाणून पाणावतील डोळे
फाईल फोटो
| Updated on: Oct 10, 2025 | 10:56 AM

Crime : आज आनंदी आणि उत्साही असणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात पुढे काय होईल काहीही सांगता येत नाही… असंच काही 60 वर्षांच्या वद्ध महिलेसोबत झालं आहे. वद्ध महिलेसोबत असं काही झालं आहे, ज्याचा तिने कधी विचार देखील केला नसेल. एका अनोळख्या जोडप्याने वद्ध महिलेचे पाय करवतीने कापल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ माजली असून पोलिसांना देखील धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थान येथील गंगापूर येथे हे धक्कादायक प्रकरण घडलं आहे.

मध्यरात्री दोनच्या सुमारास जोडप्याने वद्ध महिलेचे पाय करवतीने कापले… सर्वात आधी वद्ध महिलेला एका निर्जन स्थळी नेण्यात आलं. त्यानंतर पत्नीने वद्ध महिलेचं तोंड दाबलं आणि पतीने वद्ध महिलेचे पाय कापले. त्यानंतर आरोपी पती – पत्नीने महिलेचे चांदीचे पैजण घेऊन पळून गेले. सकाळी, रस्त्याने जाणाऱ्यांना झुडपांमधून रडण्याचा आवाज येत होते. जेव्हा वृद्ध महिलेला जखमी अवस्थेत पडलेले पाहिले तेव्हा नागरिकांनी आरडाओरडा केला.

महिलेचे पाय कापलेले होते. महिला रक्तबंबाळ अवस्थेत होती. त्यानंतर तात्काळ पोलिसांना सांगण्यात आलं. धक्कादायक परिस्थिती पाहिल्यानंतर पोलीस देखील हैराण झाले. पोलिसांनी आरोपींना पाच तासांच्या आत अटक केली. आरोपीचं नाव राम अवतार, आणि तनू उर्फ सोनिया असं आहे. दोघेही सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राम अवतार हा एक आरोपी आहे. एक महिन्यांपूर्वीच त्याची तुरुंगातून सुटका झाली होती. वृद्ध महिलेला एसएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पण उशीर झाल्यामुळे तिचे पाय जोडता आले नाहीत.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने वृद्ध महिलेला काम देतो म्हणून सांगितलं आणि तिची फसवणूक केली. आरोपींनी महिलेला सर्वातआधी त्यांच्या भाड्याच्या खोलीत नेलं. त्यानंतर रात्री दोन वाजता वृद्ध महिलेला एका निर्जन स्थळी नेलं. पत्नीने महिनेचं तोंड दाबलं आणि पतीने तिचे पाय कापले. त्यानंतर तिच्या पायातील चांदीचे पैजण चोरुन दोघे पसार झाले.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि दुपारी 1 वाजता आरोपींना अटक केली. विकलेल्या पैजणचे पैसेही पोलिसांनी जप्त केले आहेत. सध्या याप्रकरणाचा पोलीस कसून तपास करत आहे.