जया बच्चन यांनी घरी बोलावलं आणि…, ट्रान्सजेंडरने समोर आणला बिग बींच्या पत्नीचा खरा चेहरा
Jaya Bachchan: महानायक अमिताभ बच्चन यांच्या पत्नी जया बच्चन कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आता देखील जया बच्चन यांचं मोठंय सत्य समोर आलं आहे. ट्रान्सजेंडरने एक पोस्ट शेअर करत जया बच्चन यांच्याबद्दल सांगितलं आहे.

Jaya Bachchan: अभिनेत्री जया बच्चन यांना आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. त्यांनी अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारली आणि आता राजकारणात सक्रिय आहेत. पण सोशल मीडियावर मात्र जया बच्चन यांची प्रतिमा वेगळी आहे. अनेकदा जया बच्चन यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये जया बच्चन चाहत्यांवर किंवा पापाराझींवर भडकताना दिसल्या, ज्यामुळे त्यांना ट्रोल देखील करण्यात आलं. आता ट्रान्स अभिनेत्री सुशांत दिवगीकर याने जया बच्चन यांचा खरा चेहरा समोर आला आहे.
सांगायचं झालं तर, राणी कोहिनूर नावाने प्रसिद्ध सुशांत कायम ड्रेसिंग सेन्समुळे कायम चर्चेत असते… पण जया बच्चन यांच्याबद्दल तिने लिहिलेली पोस्ट सध्या तुफान व्हायरल होत आहे. राणी हिने पोस्टमध्ये जया बच्चन यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.
इन्स्टाग्रामवर पोस्ट करत राणी हिने जया बच्चन यांना देवदूत सांगितलं आहे. राणी पोस्ट करत म्हणाली, ‘गेल्या अनेक दिवसांपासून मला हे लिहियाचं होतं. कारण मी माझ्या घरी परतली आहे… आमच्या मुंबईत मी आली आहे. मला घरासारखं आराम मिळत आहे आणि माझा दिवस मोकळा आहे, तर चला सुरुवात करूया. हे जया भादुरी बच्चन यांच्याबद्दलच्या सत्याबद्दल आहे.’
‘मी पाहिलं आहे आणि तुमच्या पैकी 100 लोक सोशल मीडियावर सक्रिय असाल.. जया बच्चन यांच्यावर होणारी ट्रोलिंग आणि शिवीगाळ तुम्ही पाहिली असेल. त्यांच्याबद्दल नको त्या गोष्टी सांगण्यात येत आहेत आणि हे पाहून मला प्रचंड वाईट वाटत आहे… कारण त्यांचं खरं सत्य कोणाला माहिती नाही.’
ट्रान्सजेंडर पुढे म्हणाली, ’14 वर्षांची असताना मी पहिल्यांदा जया यांना भेटली होती. त्यावेळी, मी माझ्या पालकांना अपंग मुलांसाठी, दृष्टिहीन आणि श्रवणहीन मुलांसाठी तसेच ऑटिझम असलेल्या मुलांसाठी एक कार्यक्रम आयोजित करण्यास मदत करत होते. तेव्हा माझ्या आईने अनेक सेलिब्रिटींना प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमात सामिल होण्यासाठी फोन केलेला. त्यांनी आम्हाला मदत तर केलीच पण कोणतेही पैसे न घेता कार्यक्रमात सहभागीही झाले आणि ते तीन देवदूत म्हणजे रवीना टंडन, युवराज सिंग आणि जया बच्चन. त्यांनी किती मदत केली आणि सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य कसं आणलं हे मी कधीही विसरणार नाही.’
View this post on Instagram
जया बच्चन यांच्याबद्दल काय म्हणाली राणी…
‘जया बच्चन फक्त त्या कार्यक्रमासाठी मर्यादित राहिल्या नाहीत. त्या आईच्या संपर्कात असतात आणि मुलांच्या शिक्षणासाठी, वर्षभराच्या रेशनसाठी आणि कुटुंबांच्या दैनंदिन गरजांसाठी आर्थिक मदत केली. त्यांना फक्त मीडिया कव्हरेज टाळायचं होतं.’
जया बच्चन यांनी एचआयव्ही बाधित मुलांना आणि त्यांच्या पालकांना त्यांच्या घरी आमंत्रित केलं आणि कमी प्रतिकारशक्तीमुळे कोणत्याही प्रकारच्या ऍलर्जीचा त्रास होऊ नये म्हणून त्यांच्या होम थिएटरमध्ये अमिताभ बच्चन यांच्या ‘पा’ सिनेमाचं विशेष प्रदर्शन आयोजित केलं. इंडस्ट्रीतील सर्वात अद्भुत अभिनेत्री असण्यासोबतच, त्या अनेक लोकांच्या आयुष्यामागील आणि हास्यामागील सर्वात मोठं कारण आहेत… असं देखील पोस्टमध्ये लिहिलं आहे.
