तिचं शरीर बर्फात सुजलेलं आणि …, मुलाच्या जन्मानंतर अभिनेत्रीचं निधन, ती कायम म्हणायची…
Bollywood Actress: मुलाला जन्म देताच अभिनेत्रीने घेतला अखेरचा श्वास, बर्फावर ठेवलेलं शरीर पूर्ण सुजलेलं होतं, अभिनेत्री कायम म्हणायची 'ही' एकच गोष्ट..., मृत्यूनंतर देखील अभिनेत्री कायम असते चर्चेत...

Bollywood Actress: बॉलिवूडमध्ये असे अनेक किस्से आहेत, जे समोर आल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला. आता देखील दीपक सावंत, एक मेकअप आर्टिस्ट ज्यांनी सेलिब्रिटींसोबत काम केलं आहे. त्यांनी मोठं सत्य समोर आणलं आहे. दीपक सावंत याने अनेक महानायक अमिताभ बच्चन यांच्यापासून अनेक सेलिब्रिटींसाठी काम केलं आहे. अनेकांचं मेकअप करून त्यांनी मोठ्या पडद्यावर सेलिब्रिटींना वेगळं रुप दिलं. पण जेव्हा अभिनेत्रीच्या मृत्यूनंतर तिचं मेकअप करण्याची वेळ दीपक यांच्यावर आली, तेव्हा त्यांना प्रचंड दुःख झालं. सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा सुरु आहे तिने मुलांच्या जन्मानंतर अखेरचा श्वास घेतली.
बॉलिवूडची ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील आहे. दीपकने स्मिताच्या शेवटच्या दिवसांबद्दल सांगितलं आणि ती नेहमीच विवाहित स्त्री म्हणून मरण्याची इच्छा बाळगण्याबद्दल बोलायची… असं देखील दीपक म्हणाला.
एका मुलाखतीत दीपक म्हणाला, ‘स्मिता कायम म्हणायची मला एक विवाहित स्त्रीच्या रुपात माझ्यावर अंत्यसंस्कार झाले पाहिजे… मी तिला ओरडायचो… असं बोलू नकोस म्हणून सांगायचो… स्मिता तिच्या आईला देखील म्हणायची… विवाहित असताना मला मृत्यू यायला हवाय… तिची आई देखील तिला ओरडायची.’
‘शेवटच्या क्षणी जेव्हा मी तिचा मेकअप करत होतो तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी होतं…’ स्मिता पाटील हिच्या शेवटच्या क्षणांबद्दल सांगताना दीपक म्हणाला, ‘स्मिताची बहीण शिकागो येथून येणार होती. त्यामुळे तिला येण्यासाठी 2 -3 दिवस लागणार होते… या दरम्यान तिचं शरीर बर्फावर ठेवण्यात आलं होतं आणि पूर्णपणे सुजलेलं होतं…’
स्मिता पाटील हिचं शेवटचं मेकअप…
दीपक म्हणाला, ‘स्मिताच्या आईने मला मेकअप कीट दिलं. तिथे महानायक अमिताभ बच्चन आणि इतर दिग्गज देखील बसलेले होते. त्यांच्यासमोर मला मेकअप कीट दिलं आणि तिची आई म्हणाली, सौभाग्यवती म्हणून तिला जायचं आहे… माझ्या डोळ्यात पाणी आलं… रडत मी तिला शेवटचं तयार केलं… शेवटच्या क्षणी देखील ती प्रचंड सुंदर दिसत होती.’
राज बब्बर आणि स्मिता पाटील
राज बब्बर आणि स्मिता पाटील यांच्या नात्याबद्दल आज सर्वांना माहिती आहे. राज बब्बर यांचं पहिलं लग्न नादिरा हिच्यासोबत झालं होतं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर राज बब्बर यांच्या आयुष्यात स्मिता पाटीलची एन्ट्री झाली आणि दोघांनी मुलगा प्रतीक यातं जगात स्वागत केलं. पण प्रसूती वेदनांदरम्यान अभिनेत्रीचा मृत्यू झाला.
स्मिता पाटील हिच्या निधनानंतर राज नादिरासोबत राहू लागले . स्मिताने 28 नोव्हेंबर रोजी प्रतीकचे स्वागत केलं आणि 13 डिसेंबर 1986 रोजी वयाच्या 31 व्या वर्षी अभिनेत्रीने शेवटचा श्वास घेतला.
