पश्चिम द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात, टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू

पश्चिम द्रुतमार्गावर वाकोला परिसरात टेम्पो आणि बसमध्ये झालेल्या अपघातात टेम्पो चालक जागीच ठार झाला. तर बसमधील एक महिला किरकोळ जखमी झाली.

पश्चिम द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात, टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू
पश्चिम द्रुतगती महामार्गावर टेम्पो आणि बसमध्ये अपघात
Image Credit source: TV9
| Updated on: Mar 03, 2023 | 10:18 AM

मुंबई / रमेश शर्मा : पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाकोला पुलाजवळ रात्री टेम्पो आणि बसमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना काल रात्री घडली. या अपघातात टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला. तसेच बसमधील एक महिला जखमी झाली असून, बसमधील अन्य प्रवाशी सुखरुप आहेत. मात्र अपघातानंतर बस चालक फरार झाला आहे. पोलिसांनी गुन्हा नोंद करून, पुढील तपास सुरु केला आहे. अपघातामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.

अपघातानंतर बस चालक फरार

पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाकोला परिसरात काल रात्री मासळी वाहतूक करणारा टेम्पो आणि बसमध्ये अपघात झाला. अपघातग्रस्त बसमध्ये कॅथे पॅसिफिक एअरलाईन्सचे कर्मचारी होते आणि हे सर्व ताज लाईंड हॉटेलमध्ये जात होते. हे सर्व कर्मचारी परदेशी आहेत. अपघात झाल्यानंतर बसचा चालक बस सोडून फरार झाला.

टेम्पो चालक जागीच ठार

अपघातात टेम्पो चालक जागीच ठार झाला. बसमधील सर्व कर्मचारी सुखरुप असून, एका महिलेच्या नाकाला किरकोळ दुखापत झाली आहे. अपघातानंतर टेम्पोमधील सर्व मासळी रस्त्यावर पसरली होती. या अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. अपघाताची माहिती मिळताच मुंबई पोलीस, ट्रॅफिक पोलीस आणि अग्नीशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्य सुरु केले.