Aurangabad Murder : काल गळा चिरून एकतर्फी प्रेमातून मुलीची हत्या, आज आरोपीच्या मुसक्या आवळल्या

| Updated on: May 22, 2022 | 5:44 PM

या हत्येनंतर 24 तासाच्या आत पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. लासलगावला पोलिसांनी या आरोपीला त्याच्या बहिणीच्या घरून अटक केली. फरार आरोपी शरण सिंग आता पोलिसांच्या ताब्यात आहे.

Aurangabad Murder : काल गळा चिरून एकतर्फी प्रेमातून मुलीची हत्या, आज आरोपीच्या मुसक्या आवळल्या
औरंगाबादमध्ये गळा चिरुन मुलीची हत्या करणाऱ्याला अटक
Follow us on

औरंगाबाद : औरंगाबाद शहर (Aurangabad City) काल शनिवारी एका मुलीची गळा चिरुन हत्या (Murder) केली गेल्याने हादरुन गेलं होतं. या घटनेमुळे पोलीस प्रशासनही खडबडून जागं झालं होतं. पोलिसांनी कालपासून आरोपीचा शोध सुरू केला होता. या हत्येनंतर 24 तासाच्या आत पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. लासलगावला पोलिसांनी या आरोपीला त्याच्या बहिणीच्या घरून अटक केली. फरार आरोपी शरण सिंग आता पोलिसांच्या ताब्यात आहे. या प्रकरणात  शरण सिंगला ताब्यात घेतले गेले असून  त्याच्या सोबत आणखी कोणाचा समावेश आहे का त्याचा शोधही पोलीस घेत आहेत.

देवगिरी कॉलेजमध्ये दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास बीबीएच्या प्रथम वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा एकतर्फी प्रेमातून (One Side Love) खून करण्यात आला होता. ग्रंथी सुखप्रीत कौर प्रितपालसिंग असं या मृत तरुणीचं नाव आहे. दुपारच्या वेळी भर कॉलेजमधून तिला फरफटत ओढत घेऊन जाऊन नराधमानं तिच्यावर चाकूने वार केले होते. ही घटना पोलिसांनी समजताच पोलीस घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते, मात्र त्यापूर्वीच तरुणीचा त्या हल्ल्यात जीव गेला होता.

अशी घडली होती घटना

औरंगाबादमधील देवगिरी महाविद्यालयात बीबीएच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीला एकतर्फी प्रेमातून तरुणाने फरफटत ओढत नेऊन तिचा गळा चिरल्याची घटना शनिवारी महाविद्यालयाच्या परिसरातील रचनाकार कॉलनीत घडली होती. सुखप्रीत कौर ऊर्फ कशीश प्रीतपालसिंग ग्रंथी (१८, रा. उस्मानुपरा) असे या प्रकरणात मृत झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. तर आज पोलिसांनी या हत्याप्रकरणी शरणसिंग सेठी (वय 20, रा. भीमपुरा, उस्मानपुरा) असे आरोपीचे नाव आहे.

एकतर्फी प्रेमातून हल्ला

या दोघेही एकमेकांच्या ओळखीचे होते. शरणसिंग एकतर्फी प्रेमातून अनेक दिवस कशीशचा पाठलाग करीत होता.ही गोष्ट मुलीच्या कुटुंबीयांना समजल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनीही त्याला समजावून सांगितले होते मात्र तरीही तो तिला त्रास देत होता. शनिवारी सकाळी साडेदहा वाजता कशीश मैत्रिणीसोबत महाविद्यालयात आली असताना शरणसिंगने तिथे तिच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला.

मैत्रीणींची आरडाओरड

तिला भेटण्याचा आग्रह धरला. मात्र दुपारी चनाकार कॉलनीजवळील एका कॉफीच्या दुकानात कशीश मैत्रिणीसोबत गेली असता तेथे तो पाठलाग करीत आला. कशीश बाहेर येताच त्याने तिच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. तो विकोपाला गेला. त्यानंतर तो तिला फरफटत ओढत घेऊन जाऊन रिकाम्या प्लॉटच्या दिशेने बळजबरीने ओढू लागला. सोबतच्या मैत्रिणीने आरडाओरडा केला. तोपर्यंत तो कशीशला प्लॉटवर घेऊन गेला. तेथे त्याने कशीशच्या मानेवर, पोटावर धारदार हत्याराने वार केले. तिच्यावर हल्ला करुन शरणसिंगने तेथून दुचाकीवरुन तो पळून गेला.

महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न

औरंगाबाद या घडलेल्या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यामुळे हत्या केलेल्या आरोपीला तात्काळ अटक करा अशी मागणी मोठ्या प्रमाणात होऊ लागली होती. एकतर्फी प्रेमातून ही हत्या झाली असल्याचे पोलिसांनी सांगितले असून या प्रकरणामध्ये आणि कोणाचा समावेश आहे का, त्याचा शोधही पोलीस घेत आहेत.

पोलीस प्रकरणाच्या मुळाशी जाणार

ही घटना घडल्यानंतर आरोपीली पकडण्यासाठी पोलिसांनी हालचाली चालू केल्या होत्या. पोलीस पथकानी वेगवेगळ्या ठिकाणी कसून चौकशी केल्यानंतर आणि सीसीटीव्ही फुटेज पाहून आता एकाला संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन पोलीस कसून चौकशी करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.