Aurangabad | एका निर्भयाचा गळा घोटणारा कोण हे सिद्ध करण्यात अपयश!! तोवर दुसरीला गमावलं, व्यवस्था आणखी एका लेकींचा खून पचवणार?

एमजीएमच्या निर्भयावरील अत्याचारातील दोषींना शिक्षा कधी होईल, हे मोठं प्रश्नचिन्हं समोर असतानाच देवगिरी कॉलेजमध्ये आणखी एक भयंकर घटना घडली.

Aurangabad | एका निर्भयाचा गळा घोटणारा कोण हे सिद्ध करण्यात अपयश!! तोवर दुसरीला गमावलं, व्यवस्था आणखी एका लेकींचा खून पचवणार?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 21, 2022 | 6:34 PM

औरंगाबादः शहरातील देवगिरी कॉलेजमध्ये (Deogiri Collage) एका तरुणीवर एकतर्फी प्रेमातून (One Sided love) प्राणघातक हल्ला झाला. रक्तबंबाळ झालेल्या तरुणीचा जीव गेला. भर कॉलेजमधून 200 फूट ओढत नेऊन एका नराधमानं चाकूने भोसकलं आणि औरंगाबादनं आणखी एक लेक गमावली. शिक्षणासाठी, स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी सरसावलेली ही कळी निर्घृणपणे खुडून टाकली गेली. 10 डिसेंबर 2018 मध्ये अशाच प्रकारे दहशत निर्माण करणारा खून घडला होता. शहरातील एमजीएम कॉलेजच्या वसतीगृहात (MGM Hostel) एका 22 वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार करून तिची क्रूर हत्या करण्यात आली होती. चार वर्षानंतर कोर्टात या प्रकरणी सुनावणी झाली आणि त्यातही आरोपी निर्दोष सुटला. या प्रकरणी पोलिसांनी कसून तपास केला होता, मात्र आरोपीवरचे गुन्हे सिद्ध करण्यात त्यांना अपयश आलं. आज ज्या प्रकारे देवगिरी कॉलेजमधील ग्रंथी नावाच्या तरुणीवर झालेल्या हल्ल्यानं शहराचा थरकाप उडालाय, तोच थरकाप चार वर्षांपूर्वीही उडाला होता. मारेकऱ्याविरोधात तीव्र संतापही व्यक्त झाला होता. पण व्यवस्थेसमोर तिचे खरे मारेकरी कोण हे अद्याप सिद्ध होऊ शकलं नाही. खटल्याच्या सुनावणीनंतर दोनच दिवसातच औरंगाबादनं आणखी एका लेकीला गमावलं. आता या लेकीला तरी न्याय मिळणार का? असा सवाल जनतेतून विचारला जात आहे.

2018 सालचं हत्याकांड काय होतं?

शहरातील एमजीएम कॉलेजमधील वसतीगृहात राहणाऱ्या 22 वर्षीय विद्यार्थिनीवर 10 डिसेंहर 2018 रोजी अत्याचार करून तिची क्रूर हत्या करण्यात आली होती. रात्री साडेअकरा वाजता इतर मैत्रिणींना बाय करून ती खोलीत गेल्याचे सीसीटीव्हीत दिसले. त्यानंतर 20 तास ती बाहेरच आली नव्हती. त्यामुळे होस्टेल अधीक्षकांनी खोलीत जाऊन पाहिले असता मुलगी रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत होती. आधी तिनं आत्महत्या केल्याचं बोललं गेलं. मात्र नंतर पोस्टमॉर्टेम अहवालानरून तिचा गळा दाबून खून झाल्याचे स्पष्ट झाले. चार-पाच महिन्यांनी फॉरेन्सिक अहवालात तिच्यावर बलात्कार झाल्याचंही सिद्ध झालं. सिडको पोलीस ठाण्यात सदर प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला. सीसीटीव्ही फुटेज व इतर पुराव्यांववरून पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले देखील. या प्रकरणी मूळ उत्तर प्रदेशातील रहिवासी असलेला संशयित राहूल शर्मा याला अटक करण्यात आली होती. तो बाजूच्याच भागात बांधकाम साइटवर कामाला होता. पोलिसांनी कसून चौकशी केली असता आरोपीने मृत तरुणीच्या गळ्यातील चैनही उत्तर प्रदेशातील घरातून काढून दिली. मात्र एवढं असूनही राहुलचा या प्रकरणातील सहभाग न्यायालयात सिद्ध करता आला नाही. औरंगाबादच्या या निर्भयाचा खूनी कोण? हा प्रश्नही गूढच राहिला..

हे सुद्धा वाचा

शनिवारी आणखी एक लेक गमावली

एमजीएमच्या निर्भयावरील अत्याचारातील दोषींना शिक्षा कधी होईल, हे मोठं प्रश्नचिन्हं समोर असतानाच देवगिरी कॉलेजमध्ये आणखी एक भयंकर घटना घडली. दुपारी तीन वाजेच्या सुमारास बीबीए प्रथम वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा एकतर्फी प्रेमातून खून करण्यात आला. ग्रंथी सुखप्रीत कौर प्रितपालसिंग असं या मृत तरुणीचं नाव आहे. दुपारच्या वेळी भर कॉलेजमधून तिला 200 फूट ओढत नेत नराधमानं तिच्यावर चाकूने वार केलं. घटनास्थळी पोलीस दाखल झाले, तोवर तरुणी मृतावस्थेत होती. तिच्या शरीरावर धारदार शस्त्राच्या खुना होत्या. या घटनेतही सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक तरुण तिला बळजबरीने घेऊन जाताना दिसतोय. या आरोपीपर्यंत पोलीस कसे पोहोचतात, त्याच्यावरील गुन्हा सिद्ध होण्यास किती काळ जाणार हाही मोठा प्रश्न आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.