धक्कादायक | Aurangabad हादरलं, एकतर्फी प्रेमातून विद्यार्थिनीचा खून, 200 फूट ओढत नेलं…. पहा VIDEO

धक्कादायक | Aurangabad हादरलं, एकतर्फी प्रेमातून विद्यार्थिनीचा खून, 200 फूट ओढत नेलं.... पहा VIDEO
Image Credit source: tv9 marathi

देवगिरी कॉलेज परिसरात घडलेल्या या घटनेची बातमी संपूर्ण शहरात पसरली असून विद्यार्थिनींमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे

दत्ता कानवटे

| Edited By: मंजिरी धर्माधिकारी

May 21, 2022 | 5:27 PM

औरंगाबादः औरंगाबादसह राज्याला हादरवून टाकणारी घटना घडली आहे. शहरातील देवगिरी कॉलेज (Deogiri Collage) परिसरात एकतर्फी (One Sided Love) प्रेमातून खून (Murder) झाला आहे. प्रेमाला नकार देणाऱ्या तरुणीला अद्दल घडवण्यासाठी या नराधमाने भर कॉलेजमधून तिला 200 फूट खेचत नेले. त्यानंतर चाकूने भोसकून तिचा खून केला. या घटनेनंतर देवगिरी कॉलेजमध्ये एकच खळबळ माजली असून विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांमध्ये मोठी दहशत माजली आहे. गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादमधील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून आज याचा कहर पहायला मिळाला. शनिवारी दुपारी घडलेली ही घटना वाऱ्यासारखी संपूर्ण शहरात पसरली. यामुळे विद्यार्थिनी आणि पालक वर्गातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

या प्रकरणी मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, खून झालेल्या तरुणीचं नाव ग्रंथी सुखप्रीत कौर प्रीतपाल सिंग असं आहे. ती बीबीएच्या पहिल्या वर्षाला शिकत होती.

सीसीटीव्हीत घटना कैद

एकतर्फी प्रेमातून झालेल्या या हत्येनं शहरात खळबळ माजली असून कॉलेज परिसरातील काही सीसीटीव्हींमध्ये ही घटना कैद झाली आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण विद्यार्थिनीला जबरदस्तीने ओढत घेऊन जाताना दिसतोय. तिच्या पाठीवर मोठी सॅक दिसतेय. घटनास्थळावर दाखल झालेल्या पोलिसांना तरुणीचा मृतदेह आढळला. तरुणीच्या अंगावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खुणाही होत्या.

भीती, चिंता आणि संतप्त प्रतिक्रिया

देवगिरी कॉलेज परिसरात घडलेल्या या घटनेची बातमी संपूर्ण शहरात पसरली असून विद्यार्थिनींमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पालक वर्गातूनही घडल्या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. मृत तरुणी ही 19 वर्षांची असून ती बीबीएच्या प्रथम वर्षात शिकत होती, अशी प्राथमिक माहिती हाती आली आहे. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

 

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें