Padmavati Express: रेल्वे रुळावर रील बनवताय का ? मग तिघांबाबत काय घडलंय वाचा

रील बनवणाऱ्या तरुणांना पद्मावत एक्स्प्रेसची धडक, जाणून घ्या अपघाताचं कारण

Padmavati Express: रेल्वे रुळावर रील बनवताय का ? मग तिघांबाबत काय घडलंय वाचा
रील बनवणाऱ्या तरुणांना पद्मावत एक्स्प्रेसची धडक
Image Credit source: TV9
| Updated on: Dec 15, 2022 | 1:27 PM

मुंबई : सध्या तुम्ही ज्या प्रसिद्ध किंवा चांगल्या ठिकाणी जाता, तिथं तुम्हाला मोबाईलवरती रील (reels) बनवताना अनेक तरुण पाहायला मिळतात. प्रत्येकाला रातोरात प्रसिद्ध व्हायचं असल्यामुळे व्हिडीओ (Best Video) चांगला शूट केला जातो. परंतु रील तयार करत असलेल्या तरुणांना पद्मावत एक्स्प्रेसने (Padmavati Express) जोराची धडक दिली आहे. त्यामध्ये दोन तरुण आणि एक तरुणी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ही घटना उत्तरप्रदेश राज्यातील गजिबाद येथील आहे. ज्यावेळी पद्मावत एक्स्प्रेसची तिघांना धडक बसली, त्यावेळी तिघांचा जागीचं मृत्यू झाला आहे. पोलिसांना घटनेची माहिती मिळताचं पोलिसांनी तिघांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. तसेच तिघे रील बनवत असताना अपघात झाल्याची माहिती सांगितली आहे. ही घटना साधारण सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

आपल्या व्हिडीओला अधिक लाईक येण्यासाठी आणि तो व्हिडीओ सगळ्यांना आवडावा म्हणून चांगले व्हिडीओ तयार केले जातात. त्यासाठी व्हिडीओ बनवताना अधिक रिस्क घेतली जाते.

पद्मावत एक्स्प्रेसची जोरात धडक बसल्यामुळे तिघांची ओळख पटवण्यात पोलिसांना अडचण येत आहे. आतापर्यंत रील बनवताना अनेकांचे अपघात झाले आहेत. तसेच अपघातामध्ये अनेकांचा मृत्यू देखील झाला आहे.