पडद्यावर हिरो आणि पडद्यामागे हैवान! पाकिस्तानी अभिनेत्याच्या बायकोचा खळबळजनक आरोप

पाकिस्तानी एक्टरच्या पत्नीने केलेल्या सनसनाटी आरोपांमुळे चर्चांना उधाण! फिरोजची पत्नी अलीजाने नेमकं काय म्हटलं?

पडद्यावर हिरो आणि पडद्यामागे हैवान! पाकिस्तानी अभिनेत्याच्या बायकोचा खळबळजनक आरोप
अभिनेत्यावर पत्नीचा गंभीर आरोप
Image Credit source: instagram
| Updated on: Oct 25, 2022 | 2:33 PM

पाकिस्तान सिनेमात (Pakistani Actor) नायकाच्या भूमिकेत आपलं नाव कमालेला प्रसिद्ध अभिनेता फिरोज खान (Feroze Khan) याच्या पत्नीने सनसनाटी आरोप केला आहे. 4 वर्षांपूर्वी लग्न झालेल्या फिरोज खान याने आपल्या बायकोपासून वेगळं होण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर फिरोज खानच्या पत्नीने सातत्यानं गंभीर आरोप करत फिरोजचा खरा चेहरा लोकांसमोर आणलाय. फिरोज बायकोला दररोज मारहाण करत होता, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. हा आरोप करताना त्याच्या पत्नीने (Husband wife Dispute) काही फोटोदेखील पुरावा म्हणून शेअर केले आहेत.

फिरोज खान आणि पत्नी अलीजा यांचं चार वर्षांपूर्वी लग्न झालं. पण लग्नाच्या चार वर्षांनंतर फिरोजने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. या घटस्फोटाची कायदेशीर प्रक्रिया सध्या सुरु आहे. पण त्या दरम्यानच फिरोज आणि अलीजा यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे.

अलीजा हीने काही फोटो शेअर करत फिरोजवर मारहाणीचा गंभीर आरोप केलाय. या फोटोमध्ये अलीजाच्या शरीरावर गंभीर स्वरुपाच्या जखमा दिसून आल्या आहेत. अलीजाच्या हातावर काही जखमांचे व्रण दिसत असून तिचा डोळाही मारहाणीत सूजला होता.

हे फोटो शेअर करत फिरोज खान आपल्याला मारहाण करायचा, असा आरोप अलीजाने केला आहे. फिराज खान भलेही पडद्यावर हिरो म्हणून वावरत असेल, तर पडद्यामागे तो हैवानासारखा वागत होता, असं अलीजाचं म्हणणंय. ही बाब समोर आल्यानंतर फिरोजच्या चाहत्यांचाही त्याच्यावरचा विश्वास उडाला आहे. अनेकांनी सोशल मीडियावर फिरोज खान याला ट्रोल केलंय.

फिरोजची पत्नी अलीलजा म्हटलं की, चार वर्षांच्या संसारत मला सतत मानसिक आणि शारिरिक त्रासाला तोंड द्यावं लागलं. अनेकदा माझा फिरोजने अपमामन केला. मी संपूर्ण आयुष्य भयाच्या सावटाखाली नाही घालवू शकत. माझ्या मुलांचं आयुष्य, भविष्य चांगलं व्हावं, यासाठी मलाच निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यासाठीच मी वेगळं होण्याच्या निर्णयापर्यंत पोहोचलीय.

कोण आहे फिरोज खान?

फिरोज खान हा पाकिस्तानाची प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. नायक म्हणून अनेक पाकिस्तानी सिनेमांत त्याने काम केलंय. इश्किया, दिल क्या करे, रोमियो वेड्स हीर, वोह एक पल या सारख्या काही कार्यक्रमांत फिरोज खान याने अभिनय केलंय. अनेक बड्या पाकिस्तानी मालिकांमध्येही त्याने महत्त्वाच्या भूमिका साकारल्यात. फिरोजच्या पत्नीने केलेल्या आरोपांनंतर फिरोज खान चर्चेत आलाय. त्याच्यावर सध्या चौफेर टीका केली जातेय.