
आपण मोठ्या विश्वासाने पिकनिकसाठी फार्म हाऊसवर जातो. पण काही ठिकाणी फार्म हाऊसचे कर्मचारी आपल्या विश्वासाला तडा देण्याचं काम करतात. अशीच एक धक्कादायक घटना पनवेलच्या रियांश फार्म हाऊसवर घडली. मागच्या आठवड्यात एक कुटुंब पिकनिकसाठी पनवेलच्या रियांश फार्म हाऊसवर आलं होतं. तिथे रात्री दोनच्या सुमारास एक धक्कादायक वास्तव पिकनिकसाठी आलेल्या कुटुंबाला समजलं. एक महिला रात्री 2 वाजता फार्म हाऊसच्या वॉशरुमला गेली होती. त्यावेळी बाथरुमच्या एका कोपऱ्यातून एक छोटीशी लाइट मिणमिणत असल्याचं तिने पाहिलं. तिला संशय आला. नीट पाहिल्यानंतर समजलं की, तो छोटासा स्पाय कॅमेरा होता.
महाराष्ट्रात नवी मुंबईला लागून असलेल्या पनवेल येथील एका फार्म हाऊसवर बाथरुममध्ये स्पाय कॅमेरा मिळाला. आरोपी मॅनेजर महिला आणि मुलींचे व्हिडिओ बनवायचा. त्याला अटक करुन कोर्टात हजर करण्यात आलं. आरोपीला तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवण्यात आलं आहे. आरोपीवर पॉक्सोसह अन्य कलमं लावली आहेत. तळोजा पोलिसांनी या प्रकरणी तीन अन्य लोकांची चौकशी सुद्धा केली.
कुटुंबातील एक महिला वॉशरुमला गेली
आरोपीच नाव मनोज चौधरी आहे. तो 35 वर्षांचा आहे. धनसागर गावात तो रियांश फार्म हाऊस चालवायचा. मनोज, फार्म हाऊसवर येणाऱ्या महिलांचे गुप्त व्हिडिओ बनवायचा. एसपी विक्रम कदम यांच्यानुसार, मागच्या आठवड्यात एक कुटुंब पनवेलच्या रियांश फार्म हाऊसवर आलेलं. रात्री 2 च्या सुमारास कुटुंबातील एक महिला वॉशरुमला गेली. त्यावेळी स्पाय कॅमेरा दडवून ठेवल्याचं सत्य समजलं.
महिलेने तात्काळ आपल्या नातेवाईकांना या बद्दल कळवलं
घाबरलेली महिला जेव्हा तक्रार करण्यासाठी मनोज चौधरीच्या खोलीत गेली, तेव्हा तिने पाहिलं की मनोज तिथे काही महिलांचे व्हिडिओ पाहत होता. महिलेने नीट व्यवस्थित पाहिलं, तेव्हा तिला धक्का बसला. मोबाइलमध्ये तेच बाथरुमचे व्हिडिओ होते. महिलेने तात्काळ आपल्या नातेवाईकांना या बद्दल कळवलं. तळोजा पोलीस स्टेशनमध्ये याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी मनोज चौधरीला ताब्यात घेतलं. त्याच्या मोबाइलची तपासणी सुरु आहे.
जवळपास 17 व्हिडिओ सापडले
तपासात आरोपीच्या मोबाइलमध्ये जवळपास 17 व्हिडिओ सापडले, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण भगत यांनी दिली. चौकशीत आरोपीने मान्य केलं की, त्याने अनेक व्हिडिओ डिलिट केलेत. आम्ही सायबर एक्सपर्टच्या मदतीने डिलिट केलेला डेटा रिकव्हर करण्याची प्रोसेस सुरु केली आहे. काही अल्पवयीन मुलींचे व्हिडिओ सु्द्धा सापडले आहेत. आरोपी विरोधात पॉक्सो कायद्यातंर्गत कलमं लावण्यात आली आहेत. पोलीस आरोपी विरोधात पॉक्सो कायदा, अन्य कलमांखाली तपास करत आहेत. आरोपी मनोज चौधरीला पनवेल कोर्टात हजर करण्यात आलं. तिथे त्याला तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवण्यात आलं आहे.