AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

परमबीर सिंह बेनामी मालमत्ता प्रकरण; पुनमियाच्या जामिनावर गुरुवारी सुनावणी

सध्या फरार असणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर यांच्या बेनामी मालमत्ता प्रकरणी संजय पुनमियाच्या जामिनावर आता गुरुवारी सुनावणी होणार आहे.

परमबीर सिंह बेनामी मालमत्ता प्रकरण; पुनमियाच्या जामिनावर गुरुवारी सुनावणी
उपहार आग प्रकरणात पुराव्याशी छेडछाड केल्याप्रकरणी अंसल बंधूंना सात वर्षांची शिक्षा
| Edited By: मनोज कुलकर्णी | Updated on: Oct 22, 2021 | 10:27 AM
Share

नाशिकः सध्या फरार असणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर यांच्या बेनामी मालमत्ता प्रकरणी संजय पुनमियाच्या जामिनावर आता गुरुवारी सुनावणी होणार आहे. या गुन्हातील अटक टाळण्यासाठी पुनमियाने नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. यावर न्यायालने 26 ऑक्टोबरची तारीख दिली आहे.

पुनमिया सध्या दुसऱ्या एका प्रकरणात मुंबईत पोलिसांच्या न्यायालयीन कोठडीत आहे. ही कोठडी संपताच त्याला नाशिक ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्याची तयारी सुरू आहे. हे पाहता पुनमियाने जामिनासाठी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. पुनमियाविरुद्ध हा बारावा गुन्हा दाखल आहे. यापूर्वी त्याच्याविरोधात मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात खंडणी वसुलीसाठी धमकावणे, खंडणी गोळा करणे, फसवणूक असे विविध गुन्हे दाखल आहेत.

असे आहे प्रकरण

पुनमिया सध्या फरार असणारे आणि मुंबईचे वादग्रस्त ठरलेले माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचा निकटवर्तीय म्हणून ओळखला जातो. तो ठाणे जिल्ह्यातला रहिवासी आहे. त्याने सिन्नर तालुक्यात अनेक मालमत्तांची खरेदी केली असून, त्यात धारणगाव, मिरगाव, पाथरे येथे कोट्यवधींची जमीन खरेदी केल्याचे समोर आले आहे. ही जमीन पुनमियाने आपला मुलगा सनीच्या नावावरही खरेदी केली. त्यासाठी शेतकरी असल्याचे बनावट पुरावे जोडले. हे सारे सिन्नरच्या दुय्यम निबंध कार्यालयात बिनाबोभाट पार पडले. याचे कारण म्हणजे पुनमियाच्या डोक्यावर असलेला परमबीर सिंहाचा वरदहस्त असल्याची चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे पुनमिया पिता-पुत्रांच्या नावाचा वापर करून परमबीर सिंहांनीच ही जमीन खरेदी केल्याची चर्चा सुरू आहे. त्या अनुषंगाने आता सिन्नरमध्ये एक तक्रारही दाखल झाली आहे.

खोटी कागदपत्रे जोडली

पुनमियाने जमीन खरेदीसाठी उत्तन (ठाणे) येथील खरेदी खताची कागदपत्रे जोडली होती. तीच त्याच्यासाठी अडचणीची ठरली आहेत. यातल्या पहिल्या कागदपत्रांची तपासणी केली. तेव्हा त्यात बाबुलाल अग्रवाल आणि त्यांच्या भावाचा सातबारा जोडल्याचे निदर्शनास आले. दुसऱ्या कागदपत्रांचा तहसीलदार राजेंद्र चव्हाण यांनी तपास केला. तेव्हा त्या जमिनीचा मालकही पुनमिया नसल्याचे स्पष्ट झाले. एकंदर पुनुमियाने स्वतः बनावट कागदपत्रे सादर करून येथील जमीन खरेदी केल्याची प्राथमिकदृष्या समोर येत आहे. विशेष म्हणजे या साऱ्या प्रकरणाची तक्रार आता सिन्नर पोलीस ठाण्यात दाखल आहे.

कसून चौकशी सुरू

नाशिक जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी या साऱ्या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, मुंबई पोलिसांची कस्टडी संपताच पुनमियाला ताब्यात घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. सचिन पाटील यांची ओळख एक कडक आणि खमक्या पोलीस अधिकारी अशी ओळख आहे. त्यांच्या बदलीसाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवले होते. एका आमदाराने त्यासाठी दबाव लावला होता, अशी चर्चा होती. त्यांच्या बदलीचे आदेशही आले होते. मात्र, नागरिकांचा वाढता रोष आणि हे प्रकरण मॅटमध्ये गेल्याने सध्या सचिन पाटीलच पोलीस अधीक्षकपदी आहेत.

इतर बातम्याः

6 कांदा व्यापाऱ्यांवर 13 ठिकाणी आयकरचे छापे; पिंपळगाव बसवंत येथील कारवाईने खळबळ, कांद्याचे भाव 2500 रुपयांच्या खाली

राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे नाशिकमध्ये आयोजन; शनिवारपासून रंगणार सामने

Follow Us
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...