AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कार्यकर्त्याच्या घरावर गुंडाचा हल्ला, घरासमोरची कारच फोडली; परभणीत दहशत

परभणीतील सामाजिक कार्यकर्ते गणपत भिसे यांच्या घरावर अज्ञातांनी हल्ला करत कारची तोडफोड केली आहे. भिसे यांना जिवे मारण्याची धमकीही देण्यात आली. या घटनेमुळे रामनगर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उपवर्गीकरण समितीत सक्रिय सहभाग असल्याने हा हल्ला झाला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे.

कार्यकर्त्याच्या घरावर गुंडाचा हल्ला, घरासमोरची कारच फोडली; परभणीत दहशत
cctvImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 21, 2026 | 12:08 PM
Share

अनुसूचित जाती उपवर्गीकरण समितीत सक्रिय सहभाग असणाऱ्या गणपत भिसे यांच्या घरासमोर हल्ला करण्यता आला आहे. भिसे यांच्या घरासमोरच्या कारची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अचानक झालेल्या हल्ल्याने भिसे कुटुंबीयही भयभीत झाले आहेत. हा हल्ला करणाऱ्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी भिसे कुटुंबीयांनी केली आहे. तसेच या घटना पुन्हा घडू नये म्हणून खबरदारी घेण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे. मात्र, या घटनेमुळे परभणीच्या रामनगरमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

परभणी शहरातील रामनगर परिसरात ही घटना घडली आहे. रविवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास भिसे हे जेवण करून आपल्या घरात विश्रांती घेत होते. त्याचवेळी 12.30च्या सुमारास बाहेर आरडाओरड होत असल्याचं ऐकायला आलं. शिवीगाळ होत असल्याचंही ऐकायला आल्याने भिसे घराबाहेर पडले. यावेळी कुटुंबीयांनी भिसे यांना रोखलं. मात्र, आरोपींनी कारची तोडफोड करून घटनास्थळावरून पोबारा केला होता. या घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल झाला आहे. गाडीची तोडफोड करतानाची घटना या सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेनंतर अज्ञात दोन व्यक्ती विरोधात नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी गणपत भिसे यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचही तक्रारीत नमूद करण्यात आली आहे. पोलीस अज्ञात आरोपींचा शोध घेत आहेत.

एक लाखाचं नुकसान

या हल्ल्यात भिसे यांचं एक लाख रूपयांचे नुकसान झालं आहे. आरोपींनी शिवीगाळ करत आणि जीवे मारण्याची धमकी देत हा हल्ला केला. पोलीस तक्रारीत तसं नमूद करण्यात आलं आहे. तसेच हा हल्ला का झाला? हे समोर आलं नाही. मात्र, भिसे यांनी उपवर्गीकरणाच्या आंदोलनात सहभाग घेतला होता म्हणून तर त्यांच्या घरासमोर हल्ला करण्यात आला नाही ना? याचाही तपास पोलीस करत आहेत.

सीसीटीव्हीत काय?

सीसीटीव्हीत या हल्ल्याचे चि६ दिसत आहे. एक व्हाईट कार भिसे यांच्या घराबाहेर उभी आहे. दोन लोक या कारच्या काचेवर जड वस्तू फेकून मारताना दिसत आहे. अनेकवेळा ही व्सतू कारवर आपटल्याने कारचे काच फुटल्याचं दिसत आहे. एक व्यक्ती टीशर्टमध्ये आहे. काच फोडल्यानंतर हे दोघेहीजण घटनास्थळावरून निघून जाताना दिसत आहेत. दोघांनी तोंडाला मास्क लावलेला नाहीये. पोलीस आता हे सीसीटीव्ही फुटेज पाहून आरोपींवर कारवाई करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Follow Us
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
Ajay Baraskar : 3700 कोटींचे टेंडर्स, कोट्यवधींच्या जमिनी; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या निकटवर्तीयांवर गंभीर आरोप
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
Amravati : कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, आता एकाच ध्येयासाठी एकत्र; रवी राणा-बच्चू कडूंच्या भेटीची चर्चा
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
Sandip Deshpande : जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत? संदीप देशपांडेंचं थेट आव्हान
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
Ajay Baraskar on Manoj Jarnage : मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ, तु...; अजय बारस्करांचा मनोज जरांगेंना थेट इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
Shivsena : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
Manoj Jarange Patil on Prasad Lad : एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
Manoj Jarange on Ramdas Kadam : मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
Navnath Ban On Jarange Viral Audio Clip : मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
Jarange Patil On Viral Audio Clip : ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; मनोज जरांगे पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
Manoj Jarange Viral Audio Clip : जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ