Video | बाटलीत डिझेल दिले नाही म्हणून पेट्रोलपंप कर्मचाऱ्याला मारहाण; पेव्हर ब्लॉक डोक्यात घातला

| Updated on: Mar 10, 2022 | 6:45 AM

उल्हासनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्लास्टिकच्या बाटलीत डिझेल द्यायला नकार दिल्याने पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली आहे. कर्मचाऱ्याच्या डोक्यात पेव्हर ब्लॉकने वार करण्यात आला आहे.

Video | बाटलीत डिझेल दिले नाही म्हणून पेट्रोलपंप कर्मचाऱ्याला मारहाण; पेव्हर ब्लॉक डोक्यात घातला
पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला मारहाण
Follow us on

ठाणे : उल्हासनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्लास्टिकच्या बाटलीत डिझेल (diesel) द्यायला नकार दिल्याने पेट्रोल पंपावरील (Petrol pump) कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली आहे. कर्मचाऱ्याच्या डोक्यात पेव्हर ब्लॉकने वार करण्यात आला आहे. या घटनेत संबंधित कर्मचारी जखमी झाला आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सुभाष अडवले असे या हल्ला झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. तर रवी पवार असे हल्लेखोराचे नाव आहे. रवी पवार हा डिझेल भरण्यासाठी प्लास्टिकची बाटली घेऊन आला होता. परंतु या बाटलीचे तोंड लहान असल्यामुळे तिच्यात डिझेल भरणे शक्य नव्हते. त्यामुळे सुभाष अडवले यांनी रवी पवारला दुसरी बाटली आणण्यास सांगितले. दुसरी बाटली आणायला सांगितल्याचा राग आल्याने रवीने सुभाष यांच्यावर हल्ला केला. तिथे असलेल्या पेव्हर ब्लॉकने त्यांच्यावर वार केला. मात्र पेट्रोल पंपावर उपस्थित असलेले इतर कर्मचारी सुभाष यांच्या मदतीला धावल्याने मोठा अनर्थ टळला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

नेमकं काय घडलं?

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, उल्हासनगरच्या 17 सेक्शन परिसरात एच.पी. चा पेट्रोलपंप आहे. या पेट्रोलपंपावर रवी पवार हा डिझेल घेण्यासाठी आला होता. मात्र त्याने डिझेल बाटलीत मागितले, त्याच्या बाटलीचे तोंड छोटे असल्याने डिझेल भरण्याचे नोझल त्यात घुसत नव्हते, म्हणून पंप कर्मचारी सुभाष अडवले यांनी त्याला दुसरी बाटली आणायला सांगितली. याचा रवीला राग आल्याने त्याने सुभाष यांच्यावर हल्ला केला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या ईतर कर्मचाऱ्यांनी रवीला अडवल्याने मोठा अनर्थ टळला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

आरोपीविरोधात गुन्हा दाखल

दरम्यान सुभाष अडवले यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणात रवी पवार याच्या विरोधात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनेचे सीसीटीव्ही फुटेज मिळवले असून, या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेमध्ये पेट्रोल पंपाचे कर्मचारी सुभाष अडवले हे जखमी झाले आहेत.

संबंधित बातम्या

आधी बायकोला संपवलं, मग 3 मुलांसह स्वतःच पोलीस स्टेशनात हजर! हसत्या खेळत्या परिवारात काय घडलं?

Video : राजकीय वाद बुद्धी करी बाद, भांडणाचा राग धरून चक्क ढाबा पेटवला

डबल मर्डरने सांगली हादरलं, दोन गट आपसात भिडले, दोघांचे मुडदे पडले