सापडलेल्या काडतूसांवर या फॅक्टरीचा शिक्का, पोलिसांना मात्र वेगळाच संशय

| Updated on: May 25, 2023 | 7:40 AM

CRIME NEWS : उल्हासनगरमध्ये दोन गावठी पिस्तुलं आणि १० काडतूसं जप्त करण्यात आली आहेत. ठाणे गुन्हे शाखेच्या उल्हासनगर युनिट ४ ने ही कारवाई केली असून या काडतूसांवर ऑर्डनन्स फॅक्टरीचा शिक्का असल्याची शक्यता असून ती नेमकी कुठून आणली? याचा तपास गुन्हे शाखेकडून सुरू आहे.

सापडलेल्या काडतूसांवर या फॅक्टरीचा शिक्का, पोलिसांना मात्र वेगळाच संशय
Ulhasnagar Crime News
Image Credit source: tv9marathi
Follow us on

निनाद करमरकर, उल्हासनगर : उल्हासनगरच्या (Ulhasnagar Crime News) कॅम्प ५ मधील दुधनाका ते जुना एसटी स्टॅण्ड परिसरात दोन इसम पिस्तुलं घेऊन येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला खबऱ्यांकडून मिळाली होती. त्याअनुशंगाने गुन्हे शाखेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी एक प्लॅन तयार केला. त्या कारवाईमध्ये आसिफ नसीर शेख आणि तौफिक हसन शेख या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तुलं आणि १० जिवंत काडतूसं जप्त करण्यात आली आहेत. दोन्ही पिस्तूलं गावठी बनावटीची असली तरी काडतुसांवर (KF) म्हणजेच खडकी फॅक्टरी असा शिक्का आहे. ऑर्डनन्स फॅक्टरीत तयार केलेल्या काडतुसांवर असा शिक्का मारला जातो. त्यामुळं ही काडतूसं या दोघांकडे कुठून आली? असा प्रश्न पोलिसांना (police) पडला आहे. कल्याण उल्हासनगर या भागात रोज नव्या घडामोडी उजेडात येत असल्यामुळे पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

काडतूसं या दोघांकडे कुठून आली?

काडतूसं या दोघांकडे कुठून आली ? आणि ती खरोखर ऑर्डन्सन्स फॅक्टरीतली आहेत? की बनावट शिक्का मारलेली आहेत? याची चौकशी सध्या गुन्हे शाखेकडून सुरू आहे. ताब्यात घेतलेले आसिफ शेख आणि तौफिक शेख हे दोघे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रांजणगाव शेणपुंजी परिसरात राहणारे आहेत. या दोघांविरोधात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आला आहे. गुन्हे शाखा युनिट ४ कडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र अहिरे यांनी दिली आहे.

हे सुद्धा वाचा

चार रिक्षा फोडल्यामुळं…

कल्याण आणि उल्हासनगर परिसरात मागच्या कित्येक दिवसात क्राईमच्या अधिक घटना घडल्या आहेत. काल रात्री एका व्यक्तीने कल्याण परिसरात रिक्षा फोडल्या असल्यासं सीसीटिव्हीत दिसत आहे. चार रिक्षा फोडल्यामुळं रिक्षा चालक सुद्धा घाबरले आहेत. रिक्षा चालकांनी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असून पोलिस सीसीटिव्हीच्या माध्यमातून चोरट्याचा शोध घेत आहेत.