इचलकरंजीत मोकळ्या शेडमध्ये 3 पानी जुगाराचा अड्डा, 7 जण पोलिसांच्या ताब्यात

| Updated on: Aug 13, 2021 | 6:59 AM

इचलकरंजी शहरातील तीन पानी जुगार खेळणार्‍या 7 जणांवर डिवायएसपी पथकाने कारवाई केली. या कारवाई दरम्यान दोघेजण पसार झाले. येथील माई हायस्कूल जवळील हजारे कारखान्याच्या मोकळ्या शेडमध्ये ही पोलीस कारवाई करण्यात आली.

इचलकरंजीत मोकळ्या शेडमध्ये 3 पानी जुगाराचा अड्डा, 7 जण पोलिसांच्या ताब्यात
Follow us on

कोल्हापूर : इचलकरंजी शहरातील तीन पानी जुगार खेळणार्‍या 7 जणांवर डिवायएसपी पथकाने कारवाई केली. या कारवाई दरम्यान दोघेजण पसार झाले. येथील माई हायस्कूल जवळील हजारे कारखान्याच्या मोकळ्या शेडमध्ये ही पोलीस कारवाई करण्यात आली. त्यामध्ये सुमारे 51 हजार 700 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये 3 मोबाईल हँण्डसेट, एक मोटारसायकल व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले. याबाबत शिवाजीनगर पोलिसांकडून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

माई हायस्कूलजवळ हजारे यांच्या कारखान्याच्या मोकळ्या शेडमध्ये तीनपानी जुगार खेळत असल्याची माहिती डी.वाय.एस.पी. महामुनी यांच्या पथकाला समजली. त्यानुसार बुधवारी सायंकाळच्या सुमारास धाड टाकून जुगार खेळणार्‍या राजेंद्र दत्तात्रय गणपते (रा. षटकोन चौक), प्रदिप शामराव लोहार (रा.रामनगर), सुनिल महादेव ठोंबरे (रा. तीनबत्ती चाररस्ता), कृष्णा रामचंद्र गायकवाड (रा. रामनगर), समीर दिलावर पठाण (रा. तीनबत्ती चार रस्ता), इस्माईल मक्तुमशहा भालदार (रा. लाटणे गल्ली), शब्बीर बाबासोा मोमीन (रा. षटकोन चौक) या 7 जणांना ताब्यात घेतले. विजय राजाराम हांडे (रा. रामनगर) व राजू बाबुराव भाकरे (रा. भाकरे गल्ली) हे दोघेजण फरारी आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा :

‘भारी’ गावाजवळ ‘हाय प्रोफाईल’ जुगार, तब्बल 81 लाखांचा मुद्देमाल जप्त, 19 अट्टल जुगारी गजाआड

यवतमाळमध्ये हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड, 47 लाखांचा मुद्देमाल जप्त, 38 जणांना अटक

संचारबंदीत जुगाराचा डाव, नागपुरात ‘डॉक्टर’ नगरसेवकाला अटक

व्हिडीओ पाहा :

Police action on illegal gambling in Ichalkaranji Kolhapur