‘भारी’ गावाजवळ ‘हाय प्रोफाईल’ जुगार, तब्बल 81 लाखांचा मुद्देमाल जप्त, 19 अट्टल जुगारी गजाआड

स्वरा फार्म हाउसमधील एका हाय प्रोफाईल जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला आहे. या कारवाईत तब्बल 81 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 19 जुगाऱींच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.

'भारी' गावाजवळ 'हाय प्रोफाईल' जुगार, तब्बल 81 लाखांचा मुद्देमाल जप्त, 19 अट्टल जुगारी गजाआड
GAMBLING

यवतमाळ : जिल्ह्यातील भारी गावाजवळ असलेल्या स्वरा फार्म हाउसमध्ये एका हाय प्रोफाईल जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला आहे. या कारवाईत तब्बल 81 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 19 जुगारींच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. अटक करण्यात आलेले आरोपी हे यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यातील असल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. (Yavatmal Police raid Gambling Den 19 arrested 81 lakh rupees seized)

स्वरा फार्म हाउसमध्ये हाय प्रोफाईल जुगाराचा खेळ

मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील भारी गावाजवळ असलेल्या स्वरा फार्म हाउसमध्ये हाय प्रोफाईल जुगार खेळणे सुरु असल्याचे पोलिसांना समजले. तशी माहिती गुप्तहेरांनी पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांना दिली. त्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे भुजबळ यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बाविस्कर यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला या फार्म हाऊसवर छापा टाकण्याचे सांगितले. पोलीस अधीक्षकांनी सूचना देताच माधुरी बाविस्कर तसेच इतर स्थानिक पोलिसांनी कारवाई करणे सुरु केले.

81 लाख 23 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

त्यासाठी पोलिसांनी सापळा रचून स्वरा फार्म हाऊसवर छापा टाकला. पोलिसांच्या या कारवाईत तब्बल 19 जण रंगेहाथ पकडले गेले. पोलिसांनी या सर्व आरोपींना अटक केले असून सर्व मुद्देमाल जप्त केला आहे. या मुद्देमालाची एकूण किंमत 81 लाख 23 हजार रुपये आहे. यामध्ये जुगाऱ्यांकडून 19 लाख 23 हजार रुपये रोख, एक लाख 30 हजार रुपये किमतीचे सात मोबाईल तर 60 लाख 70 हजार रुपये किमतीची पाच चारचाकी वाहने, दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. जप्त केलेल्या या सर्व मुद्देमालाची किंमत तब्बल 81 लाख 23 हजार रुपये एवढी आहे.

एकूण 19 जणांच्या मुसक्या आवळल्या

दरम्यान, या हाय प्रोफाईल जुगाराच्या खेळात यवतमाळ तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील काही आरोपींचा समावेश आहे. पोलिसांच्या छाप्यात तब्बल 19 जणांना अटक करण्यात आली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांना जमवून जुगाराचा हाय प्रोफाईल खेळ चालवल्यामुळे येथे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

इतर बातम्या :

शहापूर पोलिसांची मोठी कारवाई, तीन दुचाकी चोरांना बेड्या, 10 दुचाक्या जप्त

बायको नसताना फेसबुक फ्रेण्डला घरी बोलावलं, तासाभरात जे घडलं, त्याने तरुणच हादरला

लग्नाच्या आमिषाने बलात्कार, औरंगाबादच्या कथित बँक अधिकाऱ्यावर मुंबईतील महिला पोलिसाचा आरोप

(Yavatmal Police raid Gambling Den 19 arrested 81 lakh rupees seized)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI