लग्नाच्या आमिषाने बलात्कार, औरंगाबादच्या कथित बँक अधिकाऱ्यावर मुंबईतील महिला पोलिसाचा आरोप

आरोपीने पीडितेसोबतच्या खासगी क्षणांचे व्हिडीओ चित्रिकरण केले. त्यानंतर तिला त्रास देत ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली, असा उल्लेख एफआयआरमध्ये केला आहे.

लग्नाच्या आमिषाने बलात्कार, औरंगाबादच्या कथित बँक अधिकाऱ्यावर मुंबईतील महिला पोलिसाचा आरोप
महिला पोलीस अधिकाऱ्याचा बँक अधिकाऱ्यावर आरोप
Follow us
| Updated on: Jun 14, 2021 | 1:11 PM

मुंबई : लग्नाच्या आमिषाने बलात्कार केल्याचा आरोप मुंबईतील महिला पोलीस अधिकाऱ्याने केला आहे. बँक अधिकारी असल्याचा दावा करणाऱ्या आरोपीविरोधात पवई पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. बलात्कारासह धमकी आणि ब्लॅकमेलिंग प्रकरणी पीडित महिला पोलीस अधिकाऱ्याने एकूण तिघांविरोधात तक्रार दाखल केली आहे. (Maharashtra Crime News Mumbai API files FIR against Aurangabad Bank officer for Rape on pretext of marriage)

सोशल नेटवर्किंग साईटवर ओळख

मुख्य आरोपी मूळ औरंगाबाद जिल्ह्यातील रहिवासी आहे. आपण बँक अधिकारी असल्याचा दावा त्याने केला आहे. सोशल नेटवर्किंग साईटच्या माध्यमातून तक्रारदार महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि आरोपीची ओळख झाली. त्यानंतर दोघं रिलेशनशीपमघ्ये होते. आरोपीने पीडितेसोबतच्या खासगी क्षणांचे व्हिडीओ चित्रिकरण केले. त्यानंतर तिला त्रास देत ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली, असा उल्लेख एफआयआरमध्ये केला आहे.

व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्याची धमकी देत आरोपी आणि त्याच्या दोघा सहकाऱ्यांनी पीडितेचे ब्लॅकमेलिंग केले, असा आरोपही करण्यात आला आहे. त्रासाला कंटाळून महिलेने शुक्रवारी पवई पोलिसात तक्रार नोंदवली. बलात्कार आणि फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, परंतु अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

मुंबईतही महिला पोलिसाचा अधिकाऱ्यावर आरोप

दरम्यान, लग्नाच्या आमिषाने बलात्कार केल्या प्रकरणी महिला पोलीस अधिकाऱ्याने पुरुष पोलीस अधिकाऱ्याविरोधात तक्रार नोंदवल्याचा प्रकार दोन महिन्यांपूर्वी उघडकीस आला होता. मुंबईतील डोंगरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. लग्नाचे आमिष दाखवून पोलीस अधिकाऱ्याने तक्रारदार महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप होता.

संबंधित बातम्या :

लग्नाच्या आमिषाने महिला पोलीस अधिकाऱ्यावर बलात्कार, डोंगरीत पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा

नांदेडच्या पोलीस निरीक्षकाकडून बलात्कार, वाशिममधील महिला पोलीस शिपायाच्या आरोपाने खळबळ

सोलापूरमध्ये महिला पोलीस कॉन्स्टेबलचा संशयास्पद मृत्यू, पतीकडून PSI सोबतच्या संबंधातून आत्महत्येचा दावा

(Maharashtra Crime News Mumbai API files FIR against Aurangabad Bank officer for Rape on pretext of marriage)

Non Stop LIVE Update
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले...
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले....
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स.
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात.
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर.
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?.
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती.
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं.
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान.
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा.
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?.