भंडाऱ्यात जुगार अड्ड्यावर धाड, 15 जण ताब्यात, 34 लाख 78 हजारांचा मुद्देमाल जप्त

भंडाऱ्यात जुगार अड्ड्यावर धाड, 15 जण ताब्यात, 34 लाख 78 हजारांचा मुद्देमाल जप्त
Bhandara Crime Branch

भंडाऱ्यात जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (Bhandara Crime Branch) धाड टाकली. यावेळी 15 जुगाऱ्यांना अटक करण्यात आली तर 5 कार, 14 मोबाईल, 2 लाख रोख रक्कम असा एकूण 34 लाख 78 हजार 960 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे

अनिल आक्रे

| Edited By: Nupur Chilkulwar

Jun 11, 2021 | 10:08 AM

भंडारा : भंडाऱ्यात जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (Bhandara Crime Branch) धाड टाकली. यावेळी 15 जुगाऱ्यांना अटक करण्यात आली तर 5 कार, 14 मोबाईल, 2 लाख रोख रक्कम असा एकूण 34 लाख 78 हजार 960 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे (Bhandara Crime Branch Raided Gambling Den 15 arrested And 34 lakh 78 thousands Seized ).

भंडारा जिल्ह्यात रावनवाडी पर्यटनस्थळावर नेचर प्राईड रिसॉर्टवर सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर भंडारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकली. यावेळी रिसॉर्ट मालकासह 15 जुगाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 5 कार, 14 मोबाईल, 2 लाख रोख रक्कम असा एकूण 34 लाख 78 हजार 960 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विशेष म्हणजे बहुतांश आरोपी हे नागपुरातील आहेत.

लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर काही लोक त्याच्या गैर फायदा घेत रावनवाडी पर्यटनस्थळावर असलेल्या नेचर प्राईड रिसॉर्टवर जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती पोलीस अधिक्षक वसंत जाधव यांना मिळाली होती. त्यानंतर तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेला आदेश करत कारवाईच्या सूचना त्यांनी दिल्या.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रात्रीच्या सुमारास ही धाड टाकली. यात 18 लोक जुगार खेळतांना आढळून आले. पोलिसांना बघून सर्वत्र पळासुरु झाली. त्यात 14 जुगाऱ्यांना सह मालका अटक करण्यात आली आहे. तर, 4 जुगारी पळून जाण्यात यशस्वी झाले आहे. त्यांच्याकडून 5 कार, 14 मोबाइल, 2 लाख रोख रक्कम असा 34 लाख 78 हजार 960 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी आरोपींविरोधात जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदविला आहे. यात सर्वाधिक आरोपी हे नागपूरचे असल्याची माहिती आहे. पुढील तपास सुरु आहे.

Bhandara Crime Branch Raided Gambling Den 15 arrested And 34 lakh 78 thousands Seized

संबंधित बातम्या :

पंढरपुरात मोटार सायकल चोरांची टोळी गजाआड, 46 वाहनांसह 15 लाखांचा मुद्देमाल जप्त

’55 लाख रुपये द्या, अन्यथा बँक उडवून देईन’, वर्ध्यात सुसाईड बॉम्बरची धमकी देऊन पैशांची मागणी

भर दुपारी दरोडेखोर बांधकाम व्यावसायिकाच्या घरात घुसला, 50 लाखांच्या खंडणीची मागणी, नागपूर पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें