पंढरपुरात मोटार सायकल चोरांची टोळी गजाआड, 46 वाहनांसह 15 लाखांचा मुद्देमाल जप्त

पंढरपूर शहर पोलिसांनी दुचाकी चोरी करणारी टोळी गजाआड केलीय. त्यांच्याकडून 46 मोटर सायकलसह एकूण 15 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

  • Updated On - 3:43 am, Fri, 11 June 21 Edited By: प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
पंढरपुरात मोटार सायकल चोरांची टोळी गजाआड, 46 वाहनांसह 15 लाखांचा मुद्देमाल जप्त
सांकेतिक छायाचित्र


पंढरपूर : आंतरजिल्हा दुचाकी चोरी करणारी टोळी पंढरपूर शहर पोलिसांनी गजाआड केलीय. आरोपींकडून विविध जिल्ह्यांमधील 46 मोटर सायकलसह एकूण 15 लाख रुपयांचा मुद्देमाल पंढरपूर शहर पोलिसांनी जप्त केला आहे. मोटर सायकलची चोरी करणाऱ्या टोळीतील आरोपींची नावं नामदेव बबन चुनाडे, विश्वास ढगे, अतुल नागनाथ जाधव, शकिल बंदेनवाज शेख, अभिमान उर्फ आबा अर्जुन खिलारे अशी आहेत. या 4 आरोपींपैकी तिघांना अटक करण्यात आल्याची माहिती सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांनी दिली (Police action of bike thief in Pandharpur 46 bikes siezed).

1 लाख रुपयांपासून ते 50 हजार रुपयांपर्यंतच्या 46 दुचाकी जप्त

संचार बंदीच्या काळात राज्यातील सोलापूर सांगली, पुणे, कोल्हापूर अशा विविध जिल्ह्यातून दुचाकी चोरी करुन विक्री करण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत होत्या. अशा चोरीच्या घटना घडत असल्याच्या तक्रारी विविध पोलीस स्टेशनला दाखल झाल्या होत्या. यामध्ये 1 लाख रुपयांपासून ते 50 हजार रुपयांपर्यंतच्या 46 दुचाकी चोरी करण्यात आल्या होत्या. मोटरसायकल चोरी संदर्भातील पहिला गुन्हा 21 मे रोजी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात नोंदवला गेला. त्यानंतर सदर पंढरपूर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी कौशल्याने तपास केला.

4 आरोपींपैकी तीन आरोपींना अटक

पोलिसांच्या तपासात पंढरपूर शहरातील नामदेव बबन चुनाडे याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. त्याने पोलिसांचा खाक्या दिसताच वेगवेगळ्या मित्रांच्या मदतीने गाड्या चोरुन विक्री केल्याची कबुली दिली. या 4 आरोपींपैकी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

यातील सर्व आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्या विरुध्द पंढरपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून 46 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांची किंमत 15 लाख रूपये असल्याची माहिती पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली.

हेही वाचा :

सर्वसामान्यांच्या मेहनतीच्या पैशांचे मोबाईल आणि बाईक पळवणारे भामटे गजाआड, बारामती पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

पुण्यात हायवेवर लूटमार, सराईत बुलेटचोर सैराट जाधव ताब्यात

सख्खे भाऊ, एकत्र चोरीचा घाट, 11 दुचाकींसह दोघांना अटक

व्हिडीओ पाहा :

Police action of bike thief in Pandharpur 46 bikes siezed