सख्खे भाऊ, एकत्र चोरीचा घाट, 11 दुचाकींसह दोघांना अटक

दुचाकी चोरी करणाऱ्या दोन सख्या भावांना डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी अटक केली

  • अमजद खान, टीव्ही 9 मराठी, कल्याण
  • Published On - 15:34 PM, 6 Feb 2021
सख्खे भाऊ, एकत्र चोरीचा घाट, 11 दुचाकींसह दोघांना अटक

कल्याण : दुचाकी चोरी करणाऱ्या दोन सख्या भावांना डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी अटक केली (Kalyan  Siblings Arrested Who Steal Bikes) आहे. त्यांच्याकडून 11 बाईक पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी हा चोरीचा प्रकार उघडकीस आणला आहे (Kalyan  Siblings Arrested Who Steal Bikes).

डोंबिवली पूर्वेतील मानपाडा परिसरात काही दिवसांपूर्वी एक बुलेट चोरीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला होता. कल्याण डोंबिवलीत दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून पोलीस चोरांच्या शोधात होते. मानपाडा पोलिस ठाण्याचे एपीआय सूरेश डांबरे यांनी बुलेट चोरीचा तपास सीसीटीव्हीच्या मदतीने सुरु केला.

या प्रकरणात पोलिसांना माहिती मिळाली की, कल्याण पूर्वेतील चक्कीनाका परिसरात एक युवक आहे. जो सीसीटीव्हीत दिसत आहे. पोलिसांनी त्या युवकाला ताब्यात घेतले. अधिक विचार केला असता एक धक्कादायक माहिती समोर आली. योगेश भानुशाली आणि त्याचा भाऊ मुकेश भानुशाली हे दोघे सख्खे भाऊ आहेत. हे दोघे दुचाकी चोरी करत होते. त्यांचा साथीदार समीर उर्फ अकरम सय्यद दा देखील या चोरीत सहभागी होता.

कल्याणचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे, एसीपी जे. डी. मोरे, वरिष्ठ पोलिस निरिक्षक हरीदादा चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु झाला. भानुशाली बंधूंकडून एक दोन नव्हे तर 11 दुचाकी हस्तगत केल्या आहे (Kalyan  Siblings Arrested Who Steal Bikes).

त्यात तीन दुचाकी या नव्या कोऱ्या बुलेट आहेत. या सर्व गाड्या ते विकण्याच्या तयारीत असताना त्यांचं बिंग फुटलं. या सख्ख्या भावांनी ठाणे जिल्ह्यात नाही तर नाशिकमध्ये चोरी केली आहे.

मुकेश हा जीम ट्रेनर होता. त्याचा भाऊ कोणत्याही दुकानावर काम करीत होता. त्यांचा मुख्य धंदा दुचाकी चोरीचा होता. पोलीस त्यांचा साथीदार समीरच्या शोधात आहेत.

Kalyan  Siblings Arrested Who Steal Bikes

संबंधित बातम्या :

चोर कशाची चोरी करतील? सांगलीत 13 कबुतर चोरीला,अल्पवयीन मुलासह तरुण ताब्यात…

कार्यक्रमासाठी कोल्हापुरात, जेवणामध्ये गुंगीचं औषध घालून कलाकारांची लूट

मुंबईतील अभियंत्यावर बलात्काराचा आरोप, 47 वर्षीय महिला पोलिसाची पुण्यात आत्महत्या