कार्यक्रमासाठी कोल्हापुरात, जेवणामध्ये गुंगीचं औषध घालून कलाकारांची लूट

जेवणामध्ये गुंगीचं औषध घालून कलाकारांना लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. (Artists Robbed In Kolhapur) 

कार्यक्रमासाठी कोल्हापुरात, जेवणामध्ये गुंगीचं औषध घालून कलाकारांची लूट

कोल्हापूर : जेवणामध्ये गुंगीचं औषध घालून कलाकारांना लुटल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरात घडली आहे. गाण्याच्या कार्यक्रमासाठी आलेल्या कलाकारांना गंजी गल्लीजवळ असलेल्या एका यात्री निवासमध्ये लुटण्यात आलं आहे. यामध्ये पाच महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे. (Artists Robbed In Kolhapur)

एका व्यक्तीच्या मध्यस्थीने लातूरचे हे कलाकार कोल्हापुरात कार्यक्रम सादर करण्यासाठी आले होते. यावेळी त्या संबंधित व्यक्तीने या कलाकारांची राहण्याची सोय एका लॉजमध्ये केली. या सर्वांना जेवण्यासाठी बाहेरुन पार्सल आणून देण्यात आलं. त्यानंतर हे कलाकार जेवण जेवले.

यानंतर सर्वच कलाकारांना गुंगी आली. त्यानंतर त्या संबंधित व्यक्तीने लॉजमध्ये प्रवेश केला. या कलाकारांच्या अंगावर असणारे दागिने आणि पैसे काढून घेतले. त्यांनतर त्या ठिकाणाहून पळ काढला. रात्रभर या कलाकारांना जाग आली नाही.

सकाळी लॉज सोडण्याची वेळ झाली तरी हे कलाकार बाहेर का आले नाही? त्यामुळे लॉज मालकाने खोली उघडून पाहिलं. तेव्हा हे सर्व कलाकार गुंगीत असल्याचे समोर आलं. त्यांनतर ही घटना उघडकीस आली.

या प्रकारणी लक्ष्मीपुरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर लॉजमध्ये उपलब्ध सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस या व्यक्तीचा शोध सुरु केला आहे. (Artists Robbed In Kolhapur)

संबंधित बातम्या : 

मुंबईतील अभियंत्यावर बलात्काराचा आरोप, 47 वर्षीय महिला पोलिसाची पुण्यात आत्महत्या

पंढरपुरात चोरीला गेलेले मोबाईल कर्नाटकात ट्रेस, अल्पवयीन चोरट्याकडे घबाड सापडलं

मॉर्निंग वॉकला गेल्या अन् परतल्याच नाहीत, जालनामधून सावध करणारी बातमी!

Published On - 10:38 pm, Thu, 4 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI