चोर कशाची चोरी करतील? सांगलीत 13 कबुतर चोरीला,अल्पवयीन मुलासह तरुण ताब्यात…

सांगली जिल्ह्यातील मिरजेत चक्क पाळीव कबुतरांच्या चोरीचा प्रकार घडला आहे. (Sangli theft stolen thirteen Columbidae in Mira

चोर कशाची चोरी करतील? सांगलीत 13 कबुतर चोरीला,अल्पवयीन मुलासह तरुण ताब्यात...
सांगली कबुतर चोरी

सांगली: गेल्या काही वर्षांपासून चोर कशाची चोरी करतील याचा भरवसा राहिलेला नाही. सांगली जिल्ह्यातील मिरजेत चक्क पाळीव कबुतरांच्या चोरीचा प्रकार घडला आहे. शहरातील एका कबुतर प्रेमीची कबुतरांची पेटी फोडून 13 कबुतर चोरून नेल्याची घटना घडली. कबुतर चोरी प्रकरणी मिरज शहर पोलिसांनी 1 अल्पवयीन मुलासह तरुणाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे. Sangli theft stolen thirteen Columbidae in Miraj

1984 पासून कबतूर पालन पहिल्यांदा चोरी

मिरज शहरातील वैरण बाजार येथील एकनाथ लोखंडे यांना कबूतर पाळण्याचा छंद आहे. यासाठी त्यांच्याकडे कबुतरांची पेटीही असून त्यामध्ये सुमारे 40 कबूतर पाळण्यात येत आहेत.1984 पासून ते कबूतर पाळतात,त्यांच्याकडील असणारे कबूतर हे अनेक स्पर्धांमध्ये नेहमी विजेतेपद पटकवतात,मात्र 15 दिवसांपूर्वी त्याची कबूतर पेटी फोडून त्यातील 13 कबूतर हे चोरून नेण्यात आली होती.ज्या मध्ये स्पर्धेच्या कबुतरांचाही समावेश होता.

एकनाथ लोखंडेनीच लावला चोरीचा छडा

एकनाथ लोखंडे यांनी मिरज शहर पोलीस ठाण्यात कबुतर चोरी बाबत तक्रार दाखल केली होती. लोखंडे यांनी त्यांच्या कबुतरांचा मिरज शहरात इतर कबुतर पाळनाऱ्यांकडे शोध सुरू केला होता. या शोधा दरम्यान लोखंडे यांना गणेश तलाव येथील एका कबूतर पाळणाऱ्याकडे आपली चार कबूतर सापडून आली. ती संबंधित व्यक्तीला विक्री करण्यात आल्याचे समोर आले. त्यानंतर लोखंडे यांनी चोरीला गेलेली आपली 4 कबूतर ही त्या व्यक्तीकडून विकत घेतली.

लोखंडे यांनी ही बाब मिरज शहर पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली.यानंतर मिरज शहर पोलिसांनी कबूतर चोरी प्रकरणी 1 अल्पवयीन मुलासह 1 तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. कबुतरांची चोरी करून ती विक्री करण्यात येत असल्याची माहिती प्राथमिक तपासात पुढे आल्याचं पोलिसांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या:

म्हशीवर करणी केल्याचा समज, बीडमध्ये चिमुकल्याची हत्या, भावकीतील दाम्पत्य अटकेत

कार्यक्रमासाठी कोल्हापुरात, जेवणामध्ये गुंगीचं औषध घालून कलाकारांची लूट

Drugs Case : सुशांत सिंग प्रकरणी एनसीबीला आणखी एक यश, महत्त्वाचा आरोपी अटकेत

(Sangli theft stolen thirteen Columbidae in Miraj)

Published On - 8:08 am, Sat, 6 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI