’55 लाख रुपये द्या, अन्यथा बँक उडवून देईन’, वर्ध्यात सुसाईड बॉम्बरची धमकी देऊन पैशांची मागणी

'55 लाख रुपये द्या, अन्यथा बँक उडवून देईन', वर्ध्यात सुसाईड बॉम्बरची धमकी देऊन पैशांची मागणी
वर्ध्यात सुसाईड बॉम्बरची धमकी देऊन पैशांची मागणी

अंगावर बॉम्ब लाऊन बँक लुटण्याचे प्रकार आपण चित्रपटांमध्ये बघितले आहेत. मात्र, अशीच काहीशी घटना वर्धेच्या सेवाग्राम येथील बँकेत घडत होती (Suicide bomber threatening letter to Bank and demanding 55 lakh rupees cash)

चेतन व्यास

| Edited By: चेतन पाटील

Jun 05, 2021 | 3:17 PM

वर्धा : अंगावर बॉम्ब लाऊन बँक लुटण्याचे प्रकार आपण चित्रपटांमध्ये बघितले आहेत. मात्र, अशीच काहीशी घटना वर्धेच्या सेवाग्राम येथील बँकेत घडत होती. पण बँकेतील अधिकाऱ्यांच्या चपळाईने संबंधित आरोपीस जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं. विशेष म्हणजे आरोपीने बनावट बॉम्ब बनवून बँकेच्या कर्मचाऱ्यांना पत्राद्वारे घाबरवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी धमकी देणाऱ्यास अटक करत त्याच्याकडील साहित्य जप्त केलंय. आरोपीने आजारावर उपचारासाठी 55 लाख रुपयांची गरज असून पैसे न दिल्यास सर्वांना संपवण्याची धमकी पत्रातून दिली होती (Suicide bomber threatening letter to Bank and demanding 55 lakh rupees cash).

नेमकं काय घडलं?

वर्धेतील सेवाग्राम पोलीस ठाण्यासमोरच सेंट्रल बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. या बँकेत तोंडाला कापड गुंडाळून आलेल्या व्यक्तीने बँक शिपायाच्या डोक्याला एअर पिस्तूल लावून पैशांची मागणी केली. पुढे तो त्याला खाली घेऊन आला. त्यानंतर त्याने पिस्तूल लपवली आणि शिपायाच्या हातात पत्र दिलं. शिपायाने ते पत्र बँकेच्या अधिकाऱ्याला दिलं (Suicide bomber threatening letter to Bank and demanding 55 lakh rupees cash).

बँकेच्या व्यवस्थापकांनी तक्रार समजून पत्र वाचलं. त्यातील मजकूर वाचून अधिकाऱ्यांना धक्काच बसला. त्यात आजारावर उपचारासाठी 55 लाख रुपयांची गरज असून मी सुसाईड बॉम्बर असून बँकेत येताच बॉम्ब अ‍ॅक्टीव्ह केलाय. सिक्युरिटी अलार्म वाजवला किंवा पोलिसांना बोलावू नये, अन्यथा सर्वांना उडवून देईल, अशी धमकी त्या पत्रात होती. बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी समयसूचकता दर्शवून याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांना आरोपीस बेड्या ठोकण्यात यश आलं. पोलिसांनी आरोपीस बेड्या कशा ठोकल्या ते आम्ही सांगूच पण धमकी पत्रात नेमका काय मजकूर होता, याबाबतची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

आरोपीचं धमकी पत्र जसंच्या तसं

“प्रिय बँक कर्मचारी,

पूर्ण पत्र वाचल्यानंतरच विचार करुन निर्णय घ्या, ही विनंती आहे,

माझ्याजवळ गमवण्यासारखं असं काहीच नाही. मी एका गंभीर आजारीने पीडित आहे. मला इलाजासाठी 55 लाख रुपयांची आवश्यकता आहे. मी जर इतक्या पैशांचा बंदोबस्त करु शकलो नाही तर पुढच्या 45 ते 60 दिवसात माझा मृत्यू निश्चित आहे. त्यामुळे मी सुसाईड बॉम्बर बनवला आहे. मी बँकेत येताच या बॉम्बला सुरु केलं आहे. आता तुमच्याकडे आणि माझ्याजवळ फक्त 15 मिनिटांचा वेळ आहे, जो आपल्या दोघांसाठी भरपूर आहे. जर कुणी हुशारी करण्याचा प्रयत्न करुन सेक्युरिटी अलार्म वाजवण्याचा किंवा पोलिसांना बोलवण्याचा प्रयत्न केला तर ती तुमच्या आयुष्यातील शेवटची चूक असेल. मी निर्णय घेण्यासाठी एका सेकंदाचा देखील विचार करणार नाही.

तुमच्याजवळ दोनच मार्ग आहेत. पहिला म्हणजे पोलिसांना बोलावलं तर स्टाफ आणि मी आपल्या दोघांपैकी कुणीही वाचणार नाही. दुसरा मार्ग म्हणजे मला 55 लाख रुपये नगदी पैसे द्या. माझं काम होईल आणि मी चालला जाईल. असंही मला यातना सोसतच मरायचं आहे. मी मरेन पण तुम्हा सगळ्यांना सोबत घेऊन मरेन. मी असंही मरणारच आहे. मला काही फरक पडत नाही. तुम्हाला जर रात्री कुटुंबासोबत झोपायचं असेल तर मी सांगतो तसं करा. मला 55 लाख रुपये कॅश द्या. तुमच्या सगळ्यांचा जीव मौल्यवान आहे. मी कुणालाही नुकसान पोहोचवणार नाही. तुमच्या पूर्ण स्टाफला समजावून द्या. हाच एकमेवर मार्ग आहे. तुम्ही आणी मी दोघं सुटू.

धन्यवाद”

पोलिसांनी आरोपीस बेड्या कशा ठोकल्या?

बँकेच्या अधिकाऱ्यांकडून याबाबत माहिती मिळताच तातडीने दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी बँक गाठली. आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. पोलिसांनी कुठलाही वेळ न दवडता त्यास पकडलं. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील कमरलेला गुंडाळलेलं बनावट बॉम्बसदृष्य साहित्य, चाकू, एअर पिस्टल जप्त केलंय. कमरेला गुंडाळलेल्या सहा लालसर रंगाच्या पाईपच्या कांड्या, वायर वगैरे छोटे डिजीटल वॉच, जोडलेली बॉम्ब सदृश्य दिसेल असं तयार होतं. त्यात विस्फोटक नव्हते. प्लास्टिकच्या पाईपमध्ये पीओपी भरलं होतं बॉम्बसदृष्य दिसत होतं.

आरोपीने पिस्तूल ऑनलाईन मागवल्याचं पोलिसांच्या तपासात पुढे आलंय. पोलिसांनी धमकी देणाऱ्यास अटक केली. या आरोपीचं नाव योगेश कुबडे असं आहे. आरोपीचा सायबर कॅफे असून त्यावरील कर्जाच परतफेड करण्यासाठी नैराश्यातून हा प्रकार केला, अशी माहिती पोलिसांच्या तपासात उघड झाली.

हेही वाचा : Melghat Superstition : पुन्हा एकदा चिमुकल्याच्या टिचभर पोटावर गरम सळईचे ढिगभर चटके

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें