Melghat Superstition : पुन्हा एकदा चिमुकल्याच्या टिचभर पोटावर गरम सळईचे ढिगभर चटके

एका 3 वर्षीय बाळाच्या पोटाला चटके दिल्याचा प्रकार समोर आला आहे. मांत्रिकाने डम्मा अर्थात पोटावर लोखंडी सळई गरम करुन चटके दिले.

Melghat Superstition : पुन्हा एकदा चिमुकल्याच्या टिचभर पोटावर गरम सळईचे ढिगभर चटके
Amravati hospital

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील आदिवासी समाज अजूनही अशिक्षित आणि अंधश्रद्धेच्या विळख्यात  (Melghat Superstition) अडकल्याचं चित्र आहे. कारण निरागस बालकावर वैद्यकीय उपचारांऐवजी अजूनही तिथे बाबा-बुवा किंवा मांत्रिकांकडून अघोरी उपचार होत आहेत. नुकतंच एका 3 वर्षीय बाळाच्या पोटाला चटके दिल्याचा प्रकार समोर आला आहे. मांत्रिकाने डम्मा अर्थात पोटावर लोखंडी सळई गरम करुन चटके दिले. त्यामुळे या कोवळ्या बालकाच्या पोटावर जखमा झाल्या आहेत. (Melghat Superstition Mantrik gives hot rod shock on baby stomach at Amravati Maharashtra Minister Yashomati Thakur visits hospital)

नेमकं प्रकरण काय?

चिखलदरा तालुक्यातील खटकाली येथील राजरत्न जामुनकर हा 3 वर्षीय बालक आठवडाभरापासून आजारी होता. या बाळाचे आई-वडील परतवाडा परिसरात कामानिमित्त असतात. त्यांनी बाळाला धामणगाव येथील खाजगी डॉक्टराकडे औषधोपचार केले. मात्र बाळाची प्रकृती न सुधारल्याने त्यांनी बाळाला एका मांत्रिकाकडे नेले. मांत्रिकाने पारंपारिक उपचार पद्धत अवलंबत, बाळाच्या पोटावर गरम सळईने चटके दिले. त्यामुळे साहजिकच बाळाची प्रकृती सुधारण्याऐवजी आणखी बिघडली. या बाळाला सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं आहे. तिथे या बाळाची मृत्यूशी झुंज सुरु आहे.

भुमका बाबाने कोवळ्या निरागस बालकाच्या पोटावर डम्मा, डागण्या देवून पोटाची चाळणी केली. बालकावर जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

मंत्री यशोमती ठाकूर यांची रुग्णालयाला भेट

दरम्यान, या प्रकाराची माहिती मिळतात, राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी रुग्णालयात जाऊन बालकाच्या तब्बेतची विचारपूस केली. यशोमती ठाकूर यांनी बाळाच्या आई – वडिलांची भेट घेतली.

अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी मेळघाटात जनजागृती करण्यात येणार असून, भोंदूबाबावर पोलिस कारवाई करण्याचे आदेश यशोमती ठाकूर यांनी यावेळी आरोग्य विभागाला दिले.

संबंधित बातम्या 

Amravati Superstition | टिचभर पोटावर 100 चटके, 8 महिन्याच्या बाळाच्या पोटावर इजा, अंधश्रद्धेचा कहर 

Melghat Superstition | आता 26 दिवसांच्या बाळाच्या पोटावर गरम सळईचे चटके, मेळघाटात अंधश्रद्धेचा कहर

(Melghat Superstition Mantrik gives hot rod shock on baby stomach at Amravati Maharashtra Minister Yashomati Thakur visits hospital)