शेअर मार्केट ट्रेडिंगसाठी चोरी करायचे, दोन परप्रांतीय चोरट्यांना अटक
सून शेअर मार्केट ट्रेडिंग करण्यासाठी सोनसाखळी चोरणाऱ्या दोन पतप्रांतीय चोरट्यांना वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तसेच त्यांच्याकडून एकूण 3 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे.

गेल्या काही दिवासंत राज्यातील गुन्हेगारीचं प्रमाण खूप वाढलं असून चोरी, दरोडा, लूटमारीच्या अनेक घटना कानावर येत असतात. असाच एक प्रकार वाकडमध्येही घडला असून शेअर मार्केट ट्रेडिंग करण्यासाठी सोनसाखळी चोरणाऱ्या दोन पतप्रांतीय चोरट्यांना वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तसेच त्यांच्याकडून एकूण 3 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे. हिफाजत अली इनाम अली अन्सारी आणि समीर फिरोज अन्सारी अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. हे दोघेही मूळचे उत्तर प्रदेशातील बिजनौ जिल्ह्यातील नगीना गावचे रहिवासी आहेत. त्यांच्या अटकेमुळे नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 29 जानेवारी रोजी संध्याकाळी वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन चोरट्यांनीबाीकवरून येऊन दोन महिलांच्या गळ्यातील सुमारे 4 तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकाले. त्या महिलांनी ताबडतोब पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली, त्यानुसार वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर तपासाची चक्र वेगाने पिरवत पोलिसांनी घटना घडली त्या परिसरातील सुमारे 80 सीसीटीव्ही फुजेजची तपासणी केली. त्यावरून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पिंपळे गुरव परिसरातील असल्याचे निष्पन्न झाले.
अखेर पोलिसांनी त्यांचा कसून शोध घेत सापळा रचत दोन्ही चोरट्यांना बेड्या ठोकल्या. त्यांना अटक करून चौकशी केली असता दोघांनीही आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडून 3 लाख 60 हजारांचे जागिने हसत्गत केले.
20 तोळे दागिने चोरीचं टार्गेट
मात्र त्या चौकशीत चोरट्यांनी जी माहिती दिली ती ऐकून पोलिसांना धक्काच बसला. आरोपी हिफाजत अली याला त्याच्या बेकरीच्या व्यवसायात बरेच नुकसान झाले होते. तसेच त्याला शेअर मार्केट ट्रेडिंगही करायचे होते, या सगळ्यासाठीच पैसा मिळवण्यासाठी त्याने 20 तोळे दागिने चोरीचे टार्गेट ठेवले होते. ते पैसे त्याला शेअर मार्केट ट्रेडिंगसाठी वापरायचे होते. त्यामुळे ते दोन्ही चोरटे सोन्याचे दागिने लुटण्यासाठी पिंपरी, चिंचवड, बाणेर, भोसरी परिसरात फिरत होते. मात्र त्याचवेळी पोलिसांनी शोध घेत त्या दोघांना अटक केली.