
भोपाळ : गुन्हा कितीही लपवण्याचा प्रयत्न केला, तरी तो लपत नाही. सत्य हे कुठल्या ना कुठल्या मार्गाने बाहेर येतच. मध्य प्रदेशमध्ये ग्वालियर येथे राहणाऱ्या ज्योती राठोर या महिलेच्या बाबतीत असच घडलं. तिने जो गुन्हा केला तो सर्वांपासून लपवला. पण मन तिला आतून खात होतं. मनी वसे ते स्वप्नी दिसे असं म्हणतात. पोटच्या चिमुकल्याची हत्या केल्यानंतर तिच्या आयुष्यातील वाईट दिवस सुरु झाले. ज्योतीने हा भयानक गुन्हा सर्वांपासून लपवला होता. पण मुलाला संपवल्यानंतर तिला भीतीदायक स्वप्न पडू लागली. मुलगा तिच्या स्वप्नात येऊ लागला. अखेर तिने नवऱ्याजवळ आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. ज्योतीच्या कबुलीनंतर तिच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.
ज्योती विवाहीत आहे. तिचं शेजारी रहाणाऱ्या मुलाबरोबर अफेअर होतं. दोघांचे प्रेमसंबंध सुरु होते. एकारात्री मुलाने ज्योतीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं होतं. मुलगा, नवरा ध्यान सिंहला हे कधीतरी सांगेल ही भीती ज्योतीच्या मनात होती. म्हणून तिने 3 वर्षाच्या मुलाला टेरेसवरुन फेकून दिलं. यात मुलाचा मृत्यू झाला. ही हत्या होती. ज्योतीचा नवरा ध्यान सिंहने तिची कबुली रेकॉर्ड केली व पोलिसांशी संपर्क साधून तक्रार नोंदवली. त्या आधारावर तपास सुरु झाला. त्यातून धक्कादायक माहिती समोर आली. चौकशीमध्ये ज्योतीच शेजारी राहणाऱ्या उदय इंदाउलिया बरोबर अफेअर असल्याच स्पष्ट झालं.
सगळे व्यस्त असताना दोघांनी एकांताचे क्षण शोधले
28 एप्रिल रोजी ही धक्कादायक घटना घडली. त्या दिवशी ध्यान सिंहच्या नव्या प्लास्टिक दुकानाच उद्घाटन होतं. त्याने अनेक लोकांना उद्घाटन कार्यक्रमासाठी बोलावलं होतं. यात उदय इंदाउलिया सुद्धा होता. प्रत्येकजण व्यस्त होता. त्यावेळी ज्योती आणि उदयने एकांताचे क्षण शोधले. दोघे टेरेसवर गेले. ज्योतीचा मुलगा तिच्या मागे आला. त्यावर ज्योती आणि उदयला त्याने नको त्या अवस्थेत पाहिलं.
त्याच्या डोक्याला मार लागला
घाबरलेल्या ज्योतीने प्रेमसंबंध उघड होतील, या भितीपोटी मुलाला टेरेसवरुन फेकून दिलं. मुलगा यामध्ये गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्याला मार लागला. त्याला रुग्णालयात नेलं. दुसऱ्यादिवशी 29 एप्रिलला मुलाचा मृत्यू झाला. सुरुवातीला मुलगा अपघाताने गच्चीवरुन खाली पडला, असं सर्वांना वाटला. काही दिवसांनी ज्योतीला भीतीदायक स्वप्न पडू लागली. अखेर तिने नवऱ्याजवळ गुन्हयाची कबुली दिली. ज्योती आणि उदय दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.