AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC Election : मोठी बातमी! महाविकास आघाडी फुटली, काँग्रेसची मोठी घोषणा, स्वबळावर लढणार

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीत मोठी फूट पडली आहे. काँग्रेसने मुंबई महानगर पालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे या निवडणुकीतील रंगत वाढली आहे.

BMC Election : मोठी बातमी! महाविकास आघाडी फुटली, काँग्रेसची मोठी घोषणा, स्वबळावर लढणार
Congress BMCImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Dec 20, 2025 | 3:51 PM
Share

राज्यातील महानगर पालिकेच्या निवडणुकींचे बिगुल वाजले आहे. 29 महानगर पालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान पार पडणार आहे, तर 16 जानेवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीत सर्वांचे लक्ष मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर असणार आहे. शिवसेना ठाकरे गट या महापालिकेत सत्ता राखण्याचा प्रयत्न करणार आहे. तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप मुंबईत सत्ता स्थापनेचा प्रयत्न करणार आहे. महायुतीची जागावाटपावर चर्चा सुरू आहे. मात्र मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीत मोठी फूट पडली आहे. काँग्रेसने मुंबई महानगर पालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे या निवडणुकीतील रंगत वाढली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार

काँग्रेसने मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला हे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. आज मुंबईत झालेल्या बैठकीनंतर रमेश चेन्नीथला यांनी आगामी निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले की, मुंबईत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. मुंबईचा हवा तसा विकास झालेला आहे. त्यामुळे आम्ही स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे.

भाजप आणि ठाकरे गटाविरुद्ध आमची लढाई – चेन्नीथला

पुढे बोलताना रमेश चेन्नीथला म्हणाले की, ‘आम्ही भाजप विरोधात आणि शिवसेना ठाकरे गटाविरोधात लढण्याचा निर्णय घेतला आहे. या लढाईत सच्चे देशभक्त आणि धर्मनिरपेक्ष लोकांनी आमच्यासोबत यावे. आमच्या हातात सत्ता आल्यानंतर आम्ही मुंबई महापालिकेचा कारभार चांगल्या पद्धतीने सांभाळू. आम्ही याबाबतचा जाहीरनामा तुमच्यासमोर सादर करू. त्यामुळे मतदारांना मी आवाहन करतो की, आम्हाला साथ द्या आम्ही मुंबईचा विकास करू.’

मुंबई महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम

राज्य निवडणूक आयोगाने 15 डिसेंबरला पत्रकार परिषद घेऊन मुंबई पालिकेच्या निवडणुकीची घोषणा केली होती. या घोषणेनुसार उमेदवारांना 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2025 या काळात अर् दाखल करता येणार आहेत. निवडणूक आयोग 31 डिसेंबरला अर्जांची छाननी करेल. 2 जानेवारी 2026 पर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येतील. मुंबई पालिकेच्या निवडणुकीसाठीचे मतदान 15 जानेवारीला तारखेला होणार आहे. तर मतमोजणी 16 जानेवारी 2026 या तारखेला केली जाईल आणि निकालही याच दिवशी घोषित केला जाईल.

Follow Us
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं