अमरावतीत पोलीस अधिकाऱ्याच्या हत्येने खळबळ, कारने उडवल्यानंतर पोटावर आणि छातीवर वार
अमरावतीत दुचाकीवरुन घरी जाणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला कारने उडवून नंतर त्याच्यावर धारदार शस्रांनी सपासप वार करुन त्याची हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे.

ठोकरले आणि खाली पाडले. त्यानंतर त्याच्या पोटावर आणि छातीवर धारदार शस्रांनी हल्लेखोरांनी सपासप वार करीत ते हल्लेखोर पसार झाल्याची प्राथमिक माहीती उघडकीस आली आहे. हल्ल्यानंतर स्थानिक ग्रामस्थानी या अधिकाऱ्याला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते, तपासून डॉक्टरांनी या अधिकाऱ्याला मृत घोषीत केले.
पोलीस अधिकारी एएसआय अब्दुल कलाम अब्दुल कादर हे अमरावती पोलीस आयुक्तालया अंतर्गत वलगाव पोलीस स्टेशनला कार्यरत होते. त्यांच्या हत्येने खळबळ उडाली आहे. ते दुचाकीवरुन घरी जात असताना त्यांना एका भरधाव दुचाकीने उडवले. त्यानंतर पाच ते सहा जणांनी त्यांच्यावर हल्ला केला आहे.त्यात पाच ते सहा हल्लेखोरांनी त्यांच्या पोटावर आणि छातीवर धारदार शस्रांनी हल्ला केला. या हल्ल्यात जबर जखमी झालेल्या ए. एस.आय. कलाम यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हा डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषीत केले.
कारने पोलीस अधिकाऱ्याला उडवले….
एका सहायक पोलीस उपनिरीक्षक अधिकाऱ्याची अशा प्रकारे हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पोलीस आयुक्त अरविंद चावरिया घटनास्थळी दाखल झाले आहेत. हल्लेखोरांना शोधण्यासाठी पोलिसांची दोन पथक रवाना करण्यात आली आहे. जनतेचे रक्षण करण्याची जबाबदारी पोलिसांवर असताना पोलीसांवरच अशा प्रकारे जीवघेणा हल्ला होत असेल तर जनतेने कोणाच्या तोंडाकडे पाहायचे असा सवाल अमरावतीकर विचारत आहेत.
