AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नंदुरबारमध्ये मध्यरात्री तब्बल 35 मजुरांचं अपहरण, खळबळजनक घटना, राजकीय नेत्यांवर गुन्हा दाखल

नंदुरबारमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बिहारमधून कामासाठी आलेल्या तब्बल 35 मजुरांचं मध्यरात्री मारहाण करुन अपहरण करण्यात आलं. या प्रकरणाची माहिती मिळताच नंदुरबार पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली. पोलिसांनी योग्य वेळी कारवाईला सुरुवात केल्यामुळे आरोपींच्या मुसक्या आवळण्याचं मोठं यश त्यांना आलं आहे.

नंदुरबारमध्ये मध्यरात्री तब्बल 35 मजुरांचं अपहरण, खळबळजनक घटना, राजकीय नेत्यांवर गुन्हा दाखल
| Updated on: Feb 06, 2024 | 6:29 PM
Share

नंदुरबार | 6 फेब्रुवारी 2024 : महाराष्ट्राची पुरोगामी अशी ख्याती आहे. पण या पुरोगामी महाराष्ट्रात आता माणुसकी जिवंत आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित व्हावा अशा घटना समोर येताना दिसत आहेत. नंदुरबारमध्ये बिहारमधून आलेल्या 35 मजुरांच्या अपहरणाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या मजुरांना मारहाण करुन जबरदस्ती एका ट्रकमध्ये कोंबण्यात आलं. त्यानंतर त्यांना अपहरण करुन भलत्याच ठिकाणी नेलं जात होतं. संबंधित प्रकरण समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात नंदुरबारमधील मोठ्या राजकीय नेत्यांची नावे चर्चेत आली आहेत. काही नेत्यांवर तर गुन्हे देखील दाखल झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या प्रकरणात नंदुरबार आणि धुळे पोलिसांनी केलेल्या कारवाईचं सर्वत्र कौतुक होत आहे.

नंदुरबारमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरात भारतीय अन्न महामंडळाचा हमाली ठेक्यावरून मोठा वाद उफाळला. या वादातून कामावर असलेल्या तब्बल 35 मजुरांचं अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. संबंधित प्रकारामुळे नंदुरबारमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी अतिशय धडाकेबाज कारवाई करत 35 मजुरांची सुटका केली आहे. या प्रकरणात नंदुरबारमधील मोठमोठ्या नेत्यांची नावे आली आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळातदेखील चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी आता माजी आमदारासह बड्या नेत्यांवर नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय?

नंदुरबारमध्ये भारतीय अन्न महामंडळाच्या हमाली ठेक्यावरुन मोठा वाद निर्माण झाला. याच वादातून या ठिकाणी असलेल्या तब्बल 35 मजुरांचे अपहरण करण्यात आले होते. पोलीसांना याबाबत माहीती मिळाल्यानंतर नंदुरबार आणि धुळे पोलीसांनी रात्रीतून संबंधितांचा पाठलाग केला. पोलिसांनी मजुरांची अपहरण करुन नेण्यात येत असलेला आयशर ताब्यात घेतला. या आयशरला गाडीला आथा नंदुरबार पोलीस ठाण्यात आणले आहे. या प्रकरणात माजी आमदार आणि भाजप आणि शिंदे गटाचे नगरसेवकांसोबतच आठ ते दहा जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरीकडे याच वादातून तालुका पोलीस ठाण्यात भाजपचे माजी आमदार, इतर बडे नेते, शिवसेना, भाजपच्या माजी नगरसेवकांसह बड्या नेत्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाने नंदुरबारचे राजकीय वाताववरण चांगेलच तापले आहे. याप्रकरणी पोलीसांनी देखील कठोर भूमिका घेतली आहे. मात्र पोलिसांनी याबाबत कॅमेरा समोर बोलण्यास नकार दिला आहे.

पोलिसांची कारवाई कशी केली?

नंदुरबार पोलीस ठाण्याचे पोलीस अधीक्षक श्रावण दत्त यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. “नंदूरबार पोलीस ठाण्यात काल मारहाणी प्रकरणी एक गुन्हा दाखल झाला. त्यानंतर मध्यरात्री पुन्हा नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 30 ते 35 मजूर जे हमाल कामासाठी बिहारमधून आले होते त्यांना बळजबरीने मारहाण करुन, हत्यारं दाखवत, दमदाटी करुन राहत असलेल्या ठिकाणावरुन एका आयसर गाडीत नेण्यात आलं होतं. त्याची कल्पना आम्हाला मध्यरात्री तीन वाजता आली. त्यानुसार तपास करण्यात आला. संबंधित गाडीचा पाठलाग करण्यात आला”, अशी माहिती पोलीस अधीक्षक श्रावण दत्त यांनी दिली.

“अखेर धुळ्याच्या शिंदखेडा पोलीस ठाणे हद्दीत ही गाडी पकडण्यात आली. त्यानंतर गाडीसह आरोपींना पुन्हा नंदुरबार पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. तसेच मजुरांनाही पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. त्यांची सुखरुप सुटका करण्यात आली. आरोपींवर कलम 144, 342, 364, 452, 504, 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी मजुरांच्या फिर्यादीवरुन तक्रार दाखल करण्यात आली आहे आणि पुढचा तपास सुरु आहे”, अशी प्रतिक्रिया पोलीस अधीक्षक श्रावण दत्त यांनी दिली.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.