गोव्यात रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या I-PAC संस्था परिसरात छापेमारी, गांजा जप्त, एकाला अटक

| Updated on: Feb 12, 2022 | 11:35 AM

गोवा पोलिसांनी शुक्रवारी पोरवोरिममधील अनेक बंगल्यांवर छापेमारी केली. येथे 8 बंगले I-PAC ने भाड्यावर घेतले आहेत. या छाप्यात आय-पॅकच्या कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली.

गोव्यात रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या I-PAC संस्था परिसरात छापेमारी, गांजा जप्त, एकाला अटक
I PAC
Follow us on

पणजी : गोव्यात तृणमूल काँग्रेससाठी (TMC) रणमैदान तयार करण्याचा प्रयत्न करत असलेल्या आय-पॅक (I-PAC) या निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांच्या संस्थेच्या आवारात पोलिसांनी छापा टाकला. कारवाईदरम्यान, पोलिसांनी प्रशांत किशोर यांच्या कंपनीतील कर्मचाऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत. पोरवोरिम शहरातून त्याला अटक करण्यात आली. आरोपीकडून गांजा जप्त करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. गोवा पोलिसांनी शुक्रवारी पोरवोरिममधील अनेक बंगल्यांवर छापेमारी केली. येथे 8 बंगले I-PAC ने भाड्यावर घेतले आहेत. या छाप्यात आय-पॅकच्या कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे वय 28 वर्ष आहे. पोलिसांनी त्याच्यावर एनडीपीएस कायद्याच्या अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ‘आज तक’च्या वेबसाईटने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

प्रशांत किशोर-तृणमूलमध्ये दुरावा

गोव्यात 14 फेब्रुवारीला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. गेल्या अडीच वर्षांपासून तृणमूल काँग्रेससाठी रणनीती आखणारे प्रशांत किशोर गोव्यात पक्षाचे काम सांभाळत आहेत. मात्र, काही दिवसांपूर्वी प्रशांत किशोर आणि तृणमूल काँग्रेसमधील संबंध बिघडल्याच्या बातम्या आल्या होत्या. प्रशांत किशोर यांचे कोणत्याही पक्षाशी संबंध बिघडण्याची ही पहिलीच वेळ नाही.

‘वन मॅन वन पोस्ट’वरुन वाद

अलिकडेच ममता बॅनर्जी सरकारमधील मंत्री चंद्रिमा भट्टाचार्य यांनी दावा केला होता की, त्यांच्या सोशल मीडिया अकाऊण्टवरुन ‘वन मॅन वन पोस्ट’ संदर्भात काही पोस्ट शेअर करण्यात आल्या होत्या. याबाबत त्यांच्याकडून कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. टीएमसीने गेल्या वर्षी जूनमध्ये वन मॅन वन पोस्ट उपक्रम सुरू केला होता. तेव्हा I-PAC कंपनीनेही त्याला मान्यता दिली आणि अनेक तरुण कार्यकर्त्यांनीही पाठिंबा दिला होता. त्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही समर्थन दिलं होतं. पण नंतर कोलकातामधील स्थानिक निवडणुकीसाठी फरहाद हकीम यांना तिकीट देण्यात आले, तेव्हा ममता बॅनर्जी यांनी समर्थन दिलं. त्यामुळे वन मॅन वन पोस्टच्या दाव्यांबाबत पक्षांतर्गत प्रश्न निर्माण झाले होते.

या वादावर I-PAC नेही आपली प्रतिक्रिया दिली होती. I-PAC ने म्हटले होते की ते कोणत्याही नेत्याची डिजिटल मालमत्ता वापरत नाहीत. जो कोणी असे दावे करत आहे, त्यांना एकतर पुरेशी माहिती नाही किंवा ते खोटे बोलत आहेत. त्याचवेळी, हे देखील जोरकसपणे सांगितले गेले आहे की तयार केलेली सोशल मीडिया अकाऊण्ट पश्चिम बंगालच्या निवडणुकीपूर्वी सक्रिय होती. नंतर सर्व पासवर्ड पक्षाकडे सुपूर्द करण्यात आले आणि प्रत्येक निर्णय पक्षाकडूनच घेतला जात होता.

संबंधित बातम्या :

प्रशांत किशोर आणि ममतांच्या तृणमूल काँग्रेसचा वाद वाढला, कुठे मिठाचा खडा पडला?

विरोधी पक्ष म्हणजे केवळ काँग्रेसच का?, भाजपला पराभूत करण्याचा फॉर्म्युला काय?; प्रशांत किशोर यांनी सांगितलं सिक्रेट