Pimpri Chinchwad crime | कोयत्याचा धाक दाखवत लुटली 35 हजारांची रोकड ; घटना सीसीटीव्हीत कैद

सांगावी परिसरात बबन खराटे यांचे एम. यु. शितोळे देशी दारू दुकान आणि बिअरशॉपी आहे. घटनेच्यावेळी दुकानात दोन अज्ञात व्यक्ती आले . त्यांनी आपल्या जवळील कोयता काढता जिवे मारणायची धमकी दिली. त्यानंतर गल्ल्यातील तब्बल ३५ हजर रुपये घेऊन पोबारा केला.

Pimpri Chinchwad crime | कोयत्याचा धाक दाखवत लुटली 35 हजारांची रोकड ; घटना सीसीटीव्हीत कैद
sangvi loot
| Edited By: | Updated on: Dec 20, 2021 | 6:01 PM

पिंपरी- जिल्ह्यातील विविध तालुक्यात दरोड्याचे सत्र सुरू आहे. अशातच पिंपरी- चिंचवड(Pimpri Chinchwad  ) शहरात अज्ञात व्यक्तींनी कोयत्याचा धाक दाखवून दुकानात लुटल्याची घटना समोर आली आहे. सांगवी (sangvi )परिसरातील एम. यु. शितोळे देशी दारू दुकान आणि बिअरशॉपीमध्ये ही घटना घडली आहे. याबाबत बबन रामराव खराटे यांनी पोल्सीत तक्रार दिली आहे.आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमके काय घडले
सांगावी परिसरात बबन खराटे यांचे एम. यु. शितोळे देशी दारू दुकान आणि बिअरशॉपी आहे. घटनेच्यावेळी दुकानात दोन अज्ञात व्यक्ती आले . त्यांनी आपल्या जवळील कोयता काढता जिवे मारणायची धमकी दिली. त्यानंतर गल्ल्यातील तब्बल 35 हजर रुपये घेऊन पोबारा केला. या दरम्यान खराटे यांनी गुंडाना अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी खराटे यांना शिवीगाळ करत मारहाण केली. संबंधित टना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

गावगुंडांना आवर घालण्याची मागणी
दोन दिवसांपूर्वीच सांगावीत भर दिवसा गोळीबार करत हत्या केल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता लुटण्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे नागरिकांकडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. परिसरात वाढ असलेले गावगुंडांचा हौदस कमी करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

ST Workers Strike: एसटीच्या विलीकरणाबाबत पुढील सुनावणी 22 डिसेंबरला, अनेकांचे निलंबन, बदल्या

Munde Vs Munde : ‘एखाद्या विधानसभेत पराभव झाला म्हणजे सगळं संपलं, असं नाही’

ST Workers Strike: एसटीच्या विलीकरणाबाबत पुढील सुनावणी 22 डिसेंबरला, अनेकांचे निलंबन, बदल्या