उसणे पैसे मागण्याचा तगादा लावला, मित्रानेच केला मित्राचा घात; असे उकलले गूढ

क्षय होळकर याने मयत दत्तात्रय पिलाणे हा माझा मित्र आहे. त्याच्याकडून मी पाच ते सहा लाख रुपये वर्षभरात घेतले होते. त्या पैशाची तो मला वारंवार मागणी करून त्रास देत होता, असे सांगितले.

उसणे पैसे मागण्याचा तगादा लावला, मित्रानेच केला मित्राचा घात; असे उकलले गूढ
| Edited By: | Updated on: Mar 28, 2023 | 7:43 AM

पुणे : भोर तालुक्यातील वरवंड गावच्या हद्दीत एक अनोळखी मृतदेह सापडला. भोर पोलीस स्टेशनला पोलीस पाटील सुधीर दिघे यांनी खबर दिली. पोलिसांनी पंचनामा करून अकस्मात मृत्यूची नोंद केली. सिंहगड पोलीसमधील मिसिंग तक्रारीनुसार दत्तात्रय शिवराम पिलाणे (वय ३२ वर्षे रा.आंबेगाव, ता.भोर) हा मित्र अक्षय होळकर याला मला काम आहे, असे बोलून गेला होता. मिसिंगमधील फोटो आणि भोर पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या मृतदेहाचे फोटोवरून घातपाताची शंका आली. दत्तात्रय पिलाणे याचा मित्र अक्षय होळकर आणि त्याचा मित्र समीर शेख यांच्याकडे तांत्रिक आणि पोलीस कौशल्यपूर्ण अधिक तपास केला.

सहा लाख घेतले होते उसणे

भोर पोलीस स्टेशनचे तपास पथक आणि स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांचे तपास पथकाने सापळा रचला. आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता खुनाची कबुली दिली. अक्षय होळकर याने मयत दत्तात्रय पिलाणे हा माझा मित्र आहे. त्याच्याकडून मी पाच ते सहा लाख रुपये वर्षभरात घेतले होते. त्या पैशाची तो मला वारंवार मागणी करून त्रास देत होता, असे सांगितले.

असा केला खून

या कारणावरुन त्याचा समीर शेख याचे मदतीने १० मार्च रोजी दत्तात्रय पिलाणे यास बोलावले. ईको गाडी हिच्यामध्ये बसवून गाडीतच दत्तात्रय याच्या डोक्यात लोखंडी हातोड्याने मारहाण केली. आरोपी समीर याने गळ्यावर आणि पोटावर चाकूने वार करून त्याचा खून केला. अंगावर कपडे नसलेला मृतदेह गाडीतून वारखंड गावाच्या हद्दीत भोर महाड रोडच्या कडेला फेकून दिला.

उसणे पैसे परत मागण्याचा तगदा लावल्याने सिनेमा दृश्यम स्टाईलने युवकाचा खून केला. फरारी असलेल्या आरोपींना पोलीसांनी अटक केली. ही कारवाई भोर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा पथकाने केली आहे. अक्षय होळकर, (वय 30 रा. आंबेगाव) आणि समीर मेहबूब शेख (वय 45 रा. पिंपरी) या दोन आरोपींना अटक करण्यात आली.

यांनी बजावली कामगिरी

पोलिसांनी या खुनाचे रहस्य उलगडले. ही कामगिरी पोलीस अधीक्षक अंकीत गोयल, अपर पोलीस अधीक्षक बारामती विभाग आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी भोर विभाग सासवड धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भोर पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण अविनाश शिळीमकर आणि स्थानिक गुन्हे पथक पोलीस, भोर पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव यांच्यासह कर्मचाऱ्यांनी केली.