कंत्राटदारांची बिलं पेंडिंग; म्हणून त्यांनी केलं असं आंदोलन, का आलेत असे दिवस?

कंत्राटदारांना स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करावे लागतात. काम झाल्यानंतर कंत्राटदारांना बिलं देण्यात येतात. परंतु, गेल्या वर्षभरापासून काम करून कंत्राटदारांना बिलं देण्यात आली नाहीत.

कंत्राटदारांची बिलं पेंडिंग; म्हणून त्यांनी केलं असं आंदोलन, का आलेत असे दिवस?
Follow us
| Updated on: Mar 27, 2023 | 5:49 PM

अकोला : शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (Public Works Department) माध्यमातून बांधकामाशी संबंधित कामे केली जातात. ही कामे कंत्राटदारांकडून केली जातात. त्यासाठी कंत्राटदारांना स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करावे लागतात. काम झाल्यानंतर कंत्राटदारांना (Contractors) बिलं देण्यात येतात. परंतु, गेल्या वर्षभरापासून काम करून कंत्राटदारांना बिलं देण्यात आली नाहीत. त्यामुळं कंत्राटदार संतप्त झाले. कर्ज घेऊन कामं केली. त्याचा व्याज बसतोय. घर कसं चालवावं, असा प्रश्न आहे. त्यामुळे त्वरित बिलं देण्यात यावेत, अशी मागणी या कंटात्रदार संघनेनं केली आहे.

पाच दिवसांपासून उपोषण

गेल्या एक वर्षापासून एसएलआर, एसडीआर, सीआर अंतर्गत काम करण्यात आली. या कामांचे करोडो रुपयांची बिलं प्रलंबित आहेत. ही देयके शासनाने 31 मार्चअगोदर अदा करावे. यासाठी स्वातंत्र इंजिनिअर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीने आंदोलन सुरू आहे. गेल्या 5 दिवसांपासून सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरु केले.

हे सुद्धा वाचा

गीत गायनाद्वारे भिक मांगो

या पाच दिवसांत कुठल्याही प्रकारची दखल घेण्यात आले नाही. त्यामुळे आज आंदोलनकर्त्यांनी सार्वजनिक कार्यालयाच्या परिसरात गीत गायनाद्वारे भिक मांगो आंदोलन केले. आंदोलनकर्ते मनोज भालेराव म्हणाले, आम्ही आमच्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहोत. परंतु, आम्हाला योग्य प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला.

कर्जाची रक्कम कशी देणार?

ज्यांच्याकडं कोणतीही काम करता येत नाही. ते लोकं भिक मागतात. आम्ही काम केलेत. पण, पैसे मिळाले नाहीत. खिशातले पैसे कामावर खर्च केले. त्यानंतर कामासाठी व्याजाने कर्जाची रक्कम घेतली.

आता काम केल्यावर पैसे मिळतील. त्या रकमेतून सर्व हिशोब करायचा आहे. पण, बिलाची देयके अद्याप हातात मिळाली नाहीत. त्यामुळे आता भिक मागितल्याशिवाय पर्याय नाही, असं संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

शासकीय काम दहा महिने थांब असं म्हटलं जातं. पण, बार महिने होऊनही बिलाची देयकं मिळाली नाहीत. त्यामुळे कंत्राटदार संतप्त झालेत. आणखी किती दिवस वाट पाहायची असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.