Pune Crime : पुण्यात कासेवाडी पोलीस चौकीत तरुणींचा राडा, महिला पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ

महिलेने तिथे ड्युटीसाठी असणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांना देखील शिवीगाळ आणि मारहाण करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी महिला पोलिसांनी खडक पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. याप्रकरणी गोंधळ घालणाऱ्या तीन महिलांविरोधात खडक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

Pune Crime : पुण्यात कासेवाडी पोलीस चौकीत तरुणींचा राडा, महिला पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jun 04, 2022 | 4:21 PM

पुणे : पुण्यातील कासेवाडी परिसरातील पोलीस चौकीत तीन तरुणींनी राडा (Clash) घालत महिला पोलीस (Lady Police) कर्मचाऱ्यांना शिवीगाळ आणि मारहाण (Beating) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. परिसरातील रहिवाशी असणाऱ्या दोन स्थानिक महिलांमध्ये वाद होता. त्या वादातून एक महिला पोलिसांत फिर्याद द्यायला गेली होती. यावेळी दुसऱ्या महिलेने पोलीस स्टेशन गाठत त्या महिलेला शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर त्या महिलेने तिथे ड्युटीसाठी असणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांना देखील शिवीगाळ आणि मारहाण करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी महिला पोलिसांनी खडक पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. याप्रकरणी गोंधळ घालणाऱ्या तीन महिलांविरोधात खडक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

दामिनी पथकातील महिला पोलिसांना केली शिवीगाळ

भवानी पेठेतल्या कासेवाडी परिसरात काही तरुणींचा आपसात वाद सुरू होता. सर्व तरुणी एकमेकांशी भांडत एकमेकींना शिवीगाळ करत होत्या. त्यापैकी एक तरुणी पोलीस चौकीत या भांडणाबाबत तक्रार देण्यासाठी गेली होती. तिच्या पाठोपाठ तिच्याशी भांडणाऱ्या तीन तरुणीही पोलीस चौकीत गेल्या. यावेळी पोलीस चौकीतील महिला पोलिसांनी तिघी तरुणींना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र काहीही ऐकून न घेता या तिघींनी पोलिसांशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांच्या दामिनी पथकातील महिला पोलीस कर्मचारी तेथे दाखल झाल्या. तरुणींनी दामिनी पथकातील महिला पोलिसांशी वाद घालून त्यांना धक्काबुक्की केली. याबाबत महिला पोलीस कर्मचाऱ्याने खडक पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. याबाबत सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिघींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Clashes of two women at Kasewadi police station in Pune, abusing a female police officer)