‘मम्मीसोबत प्रेमसंबंध ठेवतोस?’, आईच्या प्रियकराला अद्दल घडवण्यासाठी तरुणीचा चुकीचा मार्ग, लाखोंची खंडणी

| Updated on: Sep 05, 2021 | 3:59 PM

पुण्यात एक विचित्र घटना समोर आली आहे. एका 21 वर्षीय तरुणीला आपल्या आईच्या प्रेम प्रकरणाविषयी माहिती मिळाली. आईसोबत प्रेमसंबंध ठेवणाऱ्या व्यक्तीला धडा शिकविण्यासाठी तिने आपल्या आईचं व्हाट्सअ‍ॅप अकाउंट हॅक केलं

मम्मीसोबत प्रेमसंबंध ठेवतोस?, आईच्या प्रियकराला अद्दल घडवण्यासाठी तरुणीचा चुकीचा मार्ग, लाखोंची खंडणी
करोडपती प्रॉपर्टी डिलरच्या पत्नीचे 13 वर्षांनी लहान रिक्षाचालकासोबत पलायन
Follow us on

पुणे : आपल्या आयुष्यात काही अनपेक्षित अशा गोष्टी घडतात. त्या गोष्टी किंवा घटना कदाचित आपल्याला नको असतात. पण तरीही त्या घटना घडतात. अशा घटनांना संयमाने सामोरं जाणं आणि शांत डोक्याने विचार करुन योग्य निर्णय घेणं गरजेचं असतं. विशेष म्हणजे परिस्थिती स्विकारणं हे जास्त जरुरीचं असतं. पण काही तरुण परिस्थितीला तोंड देत असताना चुकीचा मार्ग निवडतात आणि त्यातच ते फसतात. पुण्यात एका 21 वर्षीय तरुणीसोबत असंच काहीसं घडलं आहे. तिला आपल्या आईच्या प्रेमसंबंधांची माहिती मिळाली. अर्थात ही माहिती तिला अनपेक्षित अशी होती. पण या प्रकरणाचा उलगडा करत असताना तिने निवडलेले मार्ग हे तिच्याच अंगलटी आले आहेत.

नेमकं प्रकरण काय?

पुण्यात एक विचित्र घटना समोर आली आहे. एका 21 वर्षीय तरुणीला आपल्या आईच्या प्रेम प्रकरणाविषयी माहिती मिळाली. आईसोबत प्रेमसंबंध ठेवणाऱ्या व्यक्तीला धडा शिकविण्यासाठी तिने आपल्या आईचं व्हाट्सअ‍ॅप अकाउंट हॅक केलं. त्यातून तिला तिच्या आईचे आणि प्रियकराचे अश्लील फोटो मिळाले. तरुणीने या विषयाची माहिती तिच्या प्रियकराला दिली. त्यानंतर दोघांनी मिळून आई आणि तिच्या प्रियकराला लुबाडण्याचा कट आखला. 15 लाख रुपये रोख रक्कम द्या नाहीतर तुमचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करतो, अशी धमकीच त्यांनी दिली. पण पोलिसांनी मोठ्या शिताफीने खंडणी मागणाऱ्या तरुणीच्या प्रियकराच्या मुसक्या आवळल्या आहेत.

पोलिसांनी तपास कसा केला?

संबंधित आरोपी मुलीच्या आईच्या 42 वर्षीय प्रियकराने पुण्याच्या विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रारदार यांचं बिल्डिंग साहित्य विक्रिचा व्यवसाय आहे. त्यांच्या दुकानात मे महिन्यात दोन अनोळखी व्यक्ती आल्या. त्यांनी अगोदर बांधकाम साहित्याची चौकशी केली. त्यानंतर अचानक शिवीगाळ करत तुझे एका महिलेसोबतच्या संबंधाचे फोटो आमच्याकडे असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांना कारमध्ये बसवून अलंकार पोलीस चौकीजवळ घेऊन गेले. त्यानंतर कारमध्ये मारहाण करुन महिलेबाबत विचारणा करत सर्व माहिती काढून घेतली. त्यांचा मोबाईल हिसकावून घेत त्यामधील फोटो आणि व्हिडिओ घेतले. ते व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन 15 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. प्रत्येक महिन्याला एक लाख आणि आठ महिन्यानंतर सर्व पैसे द्यायचे, असे धमकावले.

अखेर तक्रारदाराने 2 लाख 60 हजार रुपये दिले. आरोपींची मागणी वाढत असल्याने अखेर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत सगळी माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी सापळा रचला. पोलिसांनी तक्रारदार व्यक्तीला सांगून आरोपींना पैसे घेण्यासाठी दगडूशेठ गणपती मंदिराजवळ बोलावण्यास सांगितलं. त्यानुसार 29 वर्षीय आरोपी प्रियकर मिथून गायकवाड घटनास्थळी आला. तो तक्रारदार यांच्याकडून पैसे घेत होता. यावेळी पोलिसांनी त्याला रंगेहात पकडलं. त्यानंतर त्याला पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. तिथे त्याची चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबूल केला. तसेच या गुन्ह्यात आपल्यासोबत तक्रारदाराच्या प्रेयसीची मुलगी देखील असून तिच्याच सांगण्याने हा कट आखण्यात आला. ती मुलगी आपली प्रेयसी आहे, असंदेखील आरोपीने पोलिसांना सांगितलं. त्यामुळे पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.

आरोपींनी खंडणीच्या पैशांचं काय केलं?

फिर्यादी हे बांधकाम व्यावसायासाठी लागणारे साहित्य किरकोळ स्वरुपात विक्रीचे काम करतात. या प्रकरणात पैसे देण्यासाठी त्यांनी त्यांची कार विकली. त्यानंतर बुलेटही विकली. त्यानंतरही पैशांची मागणी थांबत नव्हती. तर आरोपी गायकवाडने मिळालेल्या पैशातून त्याच्यावरील कर्ज फेडले. तसेच तरुणीने त्या पैशातून मोठ्या प्रमाणात कपडे खरेदी केले, अशी माहिती पोलीस तपासातून समोर आली.