चारचाकी वाहनात पुरुषाचा मृतदेह, पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ

| Updated on: Oct 07, 2021 | 11:51 PM

पिंपरी चिंचवडमध्ये एका चारचाकी वाहनात मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. महेश लक्ष्मण पायगुडे असं मृतक व्यक्तीचं नाव आहे. थेरगावमध्ये हा प्रकार गुरुवारी (7 ऑक्टोबर) सायंकाळी पाचच्या सुमारास उघडकीस आला.

चारचाकी वाहनात पुरुषाचा मृतदेह, पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

पिंपरी चिंचवड (पुणे) : पिंपरी चिंचवडमध्ये एका चारचाकी वाहनात मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. महेश लक्ष्मण पायगुडे असं मृतक व्यक्तीचं नाव आहे. थेरगावमध्ये हा प्रकार गुरुवारी (7 ऑक्टोबर) सायंकाळी पाचच्या सुमारास उघडकीस आला. महेश यांचा मृतदेह बंद चारचाकीत साधारण दोन-तीन दिवसांपासून असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. हा घातपात आहे की आत्महत्या? याचा शोध वाकड पोलीस घेत आहेत. चार महिन्यांपूर्वी महेश यांच्या अकरा वर्षीय मुलीचा कॅन्सरमुळं मृत्यू झाला आणि त्यानंतर आज त्यांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाच डोंगर कोसळला आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये हत्येच्या घटनांमध्ये वाढ

दुसरीकडे पिंपरी-चिंचवडमध्ये हत्येचा घटनांमध्ये प्रचंड वाढ होताना दिसत आहे. विशेष म्हणजे गेल्या महिन्यात एका आठवड्यात हत्येच्या तब्बल सात घटना समोर आल्या होत्या. या हत्येच्या घटनांमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली होती.

हत्येची पहिली घटना

गेल्या सात दिवसांमधील ज्या सात हत्येच्या घटनांची चर्चा सुरु आहे त्यातील पहिली घटना ही 16 सप्टेंबरला घडली होती. रावेत येथे सौंदव सोमरु उराव नावाच्या सुरक्षा रक्षक महिलेची हत्या करण्यात आली होती. तिने चोराला रोखण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी झालेल्या झटापटीत चोराने महिलेवर हल्ला करत तिचा खून केला होता.

हत्येची दुसरी घटना

पिंपरी चिंचवडमध्ये हत्येची दुसरी घटना ही घोराडेश्वर येथे घडली होती. परिसरात एका नवविवाहितेची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. दोन आरोपींनी मृतक महिलेला दर्शनासाठी घोरावडेश्वर डोंगरावर नेले. त्यानंतर तिथे एकाने तिच्यावर जबरदस्ती करत बलात्कार केला. तर दुसऱ्यानेही महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली. यावेळी महिलेने प्रतिकार केल्याने आरोपीला संताप आला. त्यातून त्याने पीडितेची निर्घृणपणे हत्या केली.

हत्येची तिसरी घटना

हत्येची तिसरी घटना देखील 20 सप्टेंबरलाच घडली होती. संबंधित घटना ही निगडीतील ओटा स्कीम परिसरात घडली होती. या परिसरात जुन्या भांडणाच्या रागातून भीमराव गायकवाड नावाच्या व्यक्तीची हत्या करण्यात आली होती.

हत्येची चौथी घटना

हत्येची चौथी घटना ही 21 सप्टेंबरला चिखली येथे घडली होची. पैशाच्या वादातून आरोपीने वीरेंद्र उमरगी व्यक्तीची हत्या केली होती.

हत्येची पाचवी घटना

विशेष म्हणजे चिखली येथील घटना ताजी असताना त्याचदिवशी हिंजवडीतील सूस या ठिकाणी सुरक्षा रक्षकाच्या हत्येची घटना समोर आली होती. पत्नीबाबत अश्लील कमेंट केल्याने त्याचा खून करण्यात आल्याची माहिती त्यावेळी समोर आली होती.

हत्येची सहावी घटना

हत्येची सहावी घटना ही 22 सप्टेंबरला रावेत येथे घडली होती. रावेतच्या जाधव वस्ती परिसरात राहत्या घरात महिलेची हत्या करण्यात आली होती. खैतनबी हैदर नदाफ असं हत्या झालेल्या महिलेचं नाव होतं. पोलिसांनी केलेल्या तपासात महिलेच्या पतीनेच तिची हत्या केली, अशी धक्कादायक माहिती समोर आली. चारित्र्याच्या संशयावरुन पतीने हे कृत्य केल्याचं उघड झालं आहे.

हत्येची सातवी घटना

हत्येची सातवी घटना ही काल (23 सप्टेंबर) समोर आली होती. संबंधित घटना ही वाकड येथे घडली होती. हत्येमागील नेमकं कारण काय ते समोर आलं नव्हतं. पोलीस या प्रकरणाचा सविस्तर तपास करत आहेत.

हेही वाचा :

 ‘त्या’ रात्री नेमकं काय घडलं, NCB अधिकाऱ्यांनी आर्यनला काय विचारलं? वकिलांनी सांगितला सर्व घटनाक्रम

अनैतिक संबंधांच्या आरोपाखाली दाम्पत्याला चाबकाचा मार, विष्ठा खायला लावली, जातपंचायत समोर नग्न उभं केलं, पीडिताच्या आत्महत्येनंतर दोघांना बेड्या